‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चा ग्राहकांना दिलासा

49

नवी दिल्ली -स्टेट बँकेनं आपल्या खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. बचत खात्यासाठी निर्धारित किमान शिलकीपेक्षा (मिनिमम बॅलन्स) कमी रकमेवर आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत ७५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय बँकेनं घेतला आहे. येत्या १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून २५ कोटी ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे.
बँकेच्या या निर्णयामुळे शहरी भागात बचत खात्यावर कमी बॅलन्सवर ५० रुपये दंड आकारला जात होता. त्यात कपात करण्यात आली असून नव्या नियमानुसार, १ एप्रिलपासून केवळ १५ रुपये दंड आकारला जाईल. निमशहरी भागात आधी ४० रुपये दंड आकारला जायचा तो आता १२ रुपये आकारला जाईल. या दंडासोबतच १० रुपये जीएसटीही लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना एकून २५ रुपये दंड भरावा लागेल.