चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरजभाऊ ठाकरे यांची आज विविध विषयांवर पत्रकार परिषद.
✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की सूरज भाऊ ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत विविध विषयांवर बोलले ते पुढील प्रमाणे १) महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाकडून वारंवार महानगरपालिका नगरपंचायत व नगरपरिषद यांना ठेकेदारी पद्धतीने चालत असलेल्या सर्वच कामांबाबत कुशल-अकुशल कामगारांकरिता वारंवार वेतनाबाबत सूचना देऊन देखील निविदा काढताना महानगरपालिका नगरपंचायत व नगरपरिषद कामगारांच्या वेतनाबाबत त्या निविदांमध्ये कुठेही उल्लेख करीत नाही.
२) गोंडपिंपरी, गडचांदूर, जीवती या ठिकाणी स्थाई मुख्याधिकारी नसल्याने नगर पंचायतीचे नगर परिषदेचे कामे रेंगाळलेली आहेत. एकच महिला मुख्याधिकारी तीनही ठिकाणी कार्य करत असल्याने एकाही ठिकाणाचे काम बरोबर होत नाही.
३) गोंडपिंपरी नगरपंचायत मधील सफाई कर्मचाऱ्यांबाबतचा दिनांक १६/०२/२१ रोजी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये झालेल्या निर्णयावर गोंडपिंपरी नगरपंचायत व ठेकेदार यांनी अजून पर्यंत पूर्तता केली नसल्याने दिनांक १२/०३/२०२१ ते दिनांक १६/०३/२०२१ पर्यंत समस्त सफाई कर्मचारी हे काळ्या-फिती लावून काम करीत गोंडपिंपरी नगरपंचायत च्या विरोधामध्ये आपला निषेध दर्शवीत आहेत,
४) महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या किमान वेतन निर्देशांचे पालन करू असे लेखी आश्वासन सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे नगर परिषद तर्फे आलेले अभियंता
श्री. स्वप्नील पिदुरकर यांनी दिनांक १६/०२/२०२१ रोजी देऊन देखील जानेवारी महिन्याचा थकीत पगार व फेब्रुवारी महिन्याचा पगार देखील किमान वेतना प्रमाणे देण्यास ठेकेदाराने नकार दिला आहे. तसेच मार्च महिन्याचा १२ दिवस निघून जाऊन देखील अजून पर्यंत संपूर्ण पगार न दिल्याने दिनांक १७/०३/२०२१ पासून नगर पंचायत गोंडपिंपरी चे सफाई कर्मचारी हे परत आमरण उपोषणाला बसणार आहेत.
५) एकाच ठेकेदाराला राजुरा गोंडपिंपरी या दोन्ही नगर परिषद व नगर पंचायत चे सफाई कामाचे ठेके कसे काय प्राप्त झाले हा देखील एक संशोधनाचा विषय आहे याची चौकशी व्हावी.
६) चंद्रपूर जिल्ह्यामधील सर्व नगरपरिषद – नगरपंचायत तथा चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत सफाई काम त्याची देखरेख इत्यादी कामांच्या निविदा या जिल्हाधिकाऱ्यांनी व महानगरपालिका आयुक्तांनी रद्द करून किमान वेतन देण्याबाबत चा मुद्दा त्यामध्ये टाकून अथवा दिलेल्या कामांचे पुनर्गठन करावे जेणेकरून कंत्राटी कामाअंतर्गत काम करीत असलेले गरीब कामगार यांचा फायदा झाला पाहिजे