समुद्रपुर कार्यालयातील नायब तहसिलदार हेमंत तायडे यांची हुजदगीरी

57

समुद्रपुर कार्यालयातील नायब तहसिलदार हेमंत तायडे यांची हुजदगीरी

दादा बोरकर सह तिन व्यक्तीने केली जिल्हाधिकारी देशभरात यांच्याकडे तक्रार

उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत यांना मांगितला न्याय, तर तहशीलदार राजु रणवीर यांनाही दिले निवेदन

✒प्रा. अक्षय पेटकर प्रतीनिधी✒

समुद्रपुर:- तालुक्यातील मौजा केसलापार येथील शेतीच्या विक्री संदर्भात सौ. माला दादा बोरकर रा. वर्धा, सौ. विजया हनुमान उईके रा. नागपूर, सौ दुर्गा राजकुमार खोब्रागडे रा. भिसी जिल्हा चंद्रपूर, मनोज रामदास रामटेके राहणार चंद्रपूर ही सर्व मंडळी तहसील कार्यालयातील मिळालेल्या नोटीस नुसार २७ जानेवारी २०२१ रोजी नायब तहसीलदार हेमंत तायडे यांच्या दालनात ठरलेल्या वेळी उपस्थित झाले. ज्या कार्यालयाने नोटीस बजावला त्याच कार्यालयाचे नायब तहसीलदार तायडे यांचा रुबाबदार व अजब- गजब कारभार मागासवर्गीय असलेल्या सर्व परिवारांना अनुभवावा लागला. घडलेल्या घटनेची तक्रार जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, व तहसीलदार समुद्रपूर यांच्याकडे नोंदविण्यात आली आहे. वरिष्ठांनी तातडीने संबंधितावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. जर न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असे सुद्धा दादा बोरकर यांनी माहिती दिली.

घटना अशी आहे की माला मधुकर बोरकर रा. प्रभाग क्रमांक २७ यशवंत रामटेके यांच्या घराजवळ तालुका जिल्हा वर्धा यांना पोस्टाने न्यायालयीन शिका व सहिसहित तहसील कार्यालयातील महसूल अधिकारी नायब तहसीलदार यांनी नोटीस बजावला होता. त्यामध्ये नमूद केले होते की समुद्रपूर तालुक्यातील मौजा येथील शेत सर्वे क्रमांक १०३ बाबतचे आक्षेप प्रकरणात आपण २७ जानेवारी २०२१ रोजी आमच्या न्यायालयात हजर राहावे आवश्यक आहे. तसेच त्या दिवशी सकाळी ११ वाजता मुक्कामी तहसील कार्यालय समुद्रपूर येथे आमच्यासमोर हजर राहावे. येताना आपल्या सोबत सदर प्रकरणातील आवश्यक माहिती व दस्तावेज घेऊन यावे यात चुकू नये पेशी तारखेवर हजर न झाल्यास एकतर्फी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे नमूद करण्यात आले होते. त्या पत्रावर न्यायालयीन शिक्का होता संबंधित नोटीस मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल यांनी तालीम केल्याची प्रत तहसील कार्यालय समुद्रपूर येथे मिळाल्याची सही व नोंद घेण्याची ही नमूद केले होते.
२७ जानेवारी रोजी मौजा केसलापार येथील शेत सर्वे क्रमांक १०३ बाबतचे आक्षेप समितीच्या फेरफार संदर्भात नोंदवण्यासाठी एकाच परिवारातील तीन महिला व एक पुरुष वेळेवर उपस्थित झाले त्याबाबतच मिळालेल्या नोटीस समुद्रपुर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार हेमंत तायडे यांना दाखविण्यात आला. दादा बोरकर त्यांच्या पत्नीला घेऊन समुद्रपूर तहसील कार्यालय येथे गेले होते परंतु नायब तहसीलदार हेमंत तायडे यांना बोरकर यांनी सांगितले की आम्ही सहा लोक आहोत तेव्हा नायब तहसीलदार म्हणाले की तुम्हाला हा नोटीस कोणी दिला तुम्हाला तारीख कोणी दिली हे मला माहीत नाही. आणि रागाच्या भरात नोटीसची प्रत फेकून दिली. ति प्रत दादा बोरकर यांनी उचलली त्याच कारभारी नायड तहसीलदाराने कावळे बाबू कडे जाण्यासाठी सांगितले. त्यानंतर ही सर्व मंडळी कावळे बाबू यांच्याकडे गेली त्यांना नोटीस दिल्यानंतर त्यांनी नोटीस वाचला वाचून झाल्यावर कावळे बाबु म्हणाले की तुम्ही तायडे साहेबांकडेच जा. पुन्हा सर्व मंडळी नायब तहसीलदार नायब तहसीलदार हेमंत तायडे कडे गेले असता. रागाच्या भरात तुम्ही माझ्याकडे आले कसे माझ्याकडे काहीही नाही मी नोटीस पाठविला नाही माझी सही नाही व माझे नाव सुद्धा नाही यावर दादा बोरकर म्हणाले की साहेब तुम्ही नोटीस फेकून देण्यापेक्षा माझे ऐकुणतर घ्या असे म्हणाले. तरी देखील दादा बोरकर यांना त्यांनी बाहेर जा मंटल ना बाहेर जा असे जोर जोराने ओरडले व वाद घातला. शेवटी सर्व राग दादा बोरकर व त्यांच्या परिवाराने लपविला कारण न्याय दंडाधिकारी यांचे कार्यालय होते उगाच आपली चूक नसताना गुन्हे दाखल होतील आपण मजुरी करणारे लोक नाही.

कारण नसताना पोलिसांचा मार खावा लागेल न्यायालयात न्याय मागावा लागेल त्यामुळे बोरकर परिवारातील सर्व मंडळी गप्प राहिली व दादा बोरकर यांनी पुन्हा म्हटले की साहेब एक तारीख तर लिहून द्या त्यावेळेस साहेबांचं डोकं फिरलं होतं तरी का साहेबांनी हस्ताक्षरात १ जानेवारी २०२१ ची तारीख टाकून दिली मी तारीख टाकली आहे. आणि त्या तारखेवर या असे तायडे साहेब म्हणाले. व या तारखे वरच बयाना साठी या आता भविष्यात ही तारीख येणार तरी केव्हा याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांना सोबत सन्मानाने संवाद घालावा किंवा साधावा लागतो पण प्रेमाने बोलणे तर सोडा अंगावर धावून येणे खालच्या पातळीवर शिव्या देणे या शब्दाचा वापर खालच्या स्तरातील होतो.

तेव्हा राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण केलेल्या परीक्षा अधिकाऱ्यांना त्या कार्यकाळात तसेच शिकविले जाते का ते कळण्यास मार्ग नाही. आता नायब तहसीलदार हेमंत तायडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बोरकर परिवार यांनी केली आहे. जर न्याय मिळाला नाही तर नायब तहसीलदार यांच्या कार्यालयात जावुन आमरण उपोषणाला बसावे लागेल. अशी भुमिका घेतल्या जाईल असेही सांगितले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा गोषवारा जिल्हाधिकारी यांनी द्यावा जिल्हाधिकारी यांनी अथवा उपविभागीय अधिकारी यांनी त्याच परिसरातील सर्वांना बयाणासाठी तातडीने बोलविण्यात यावे. येथील जमिनीच्या विक्री बाबत निवारा करावा अशी मागणी सुद्धा केली जात आहे. पण समुद्रपूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार हेमंत तायडे यांचा अजब कारभार मात्र तत्कालीन काळात उपस्थित असलेल्या नागरिकांनी पहिला यापूर्वीसुद्धा कारभारी नायब तहसीलदार तायडे यांच्या या प्रकरणाला न्याय देणार कोण असा प्रश्न बोरकर परिवारातील नागरिक करीत आहे.