Kanchan Yeskar murder case in Nagpur Kumbhapur, husband and mother-in-law stabbed Kanchan to death.
Kanchan Yeskar murder case in Nagpur Kumbhapur, husband and mother-in-law stabbed Kanchan to death.

नागपुर कुंभापूर येथील कांचन येस्कर हत्याकांड, पती आणि सास-याने कुऱ्हाडीने सपासप वार करून कांचन केली हत्या.

Kanchan Yeskar murder case in Nagpur Kumbhapur, husband and mother-in-law stabbed Kanchan to death.
मृतक कांचन अभय येस्कर

✒युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपुर,दि.12मार्च:-माणुसकीला काळिमा घसणारी घटना नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात कुंभापूर या गावात सौ, कांचन अभय येस्कर या तरुण महिलेला तिचा नवरा अभय येस्कर तिचा सासरा हरामखोर दिवाकर येस्कर यांनी शेतात नेऊन भरदिवसा दुपारी 4 वाजता मुलगा होत नाही व माहेरून पैसे मागून आन या कारणासाठी कुऱ्हाडीने सपासप वार करून जाग्यावर मारून टाकले कांचन ला पहिली मुलगी झाली तेव्हा पासून तिच्या सासरच्या लोकांनी तिच्यावर अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली त्यानंतर दुसरी मुलगी झाली त्यामुळे जास्तच छळ करणे सुरू केले तिचा सासरा तिच्यावर वाईट नजरेने पाहायचा त्याने तिला चक्क शरीर सुखाची मागणी केली तेव्हा तिने नवऱ्याला सांगितले तर नवऱ्याने कांचन लाच बेधुम मारले तिचा सासरा दिवाकर येस्कर हा मुलाला म्हणे इला मारून टाक मी दुसऱ्या दिवशी दुसरी बायको करून देतो शेवटी नवऱ्याने कांचन ला मारून च टाकले भर दिवसा तिला तडफडत तडफडत मारून टाकले काय गुन्हा होता तिचा तिने सुंदर स्या दोन मुलीला जन्म दिला हा गुन्हा आहे काय मुलीच्या जागी मुलगा झाला नाही हा तिचा गुन्हा आहे का..

Kanchan Yeskar murder case in Nagpur Kumbhapur, husband and mother-in-law stabbed Kanchan to death.

मृतक कांचन अभय येस्कर

मौदा पोलिसांनी फक्त तिच्या नालायक नवऱ्याला च अटक केली मुख्य सूत्रधार दिवाकर येस्कर आहे याला अटक झाली च पाहिजे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाङी च्या वतीने मौदा पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे साहेब यांना जिल्हा महासचिव प्रमोदभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली व वरिष्ठ जिल्हा महासचिव मा,फुलसर जी सतीबावणे, मा, प्रविण जी बागडे जिल्हा उपाध्यक्ष मा, संजय जी मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष मा,मधुकरराव बागडे जिल्हा उपाध्यक्ष, मा,हर्षानंद भगत जिल्हा महासचिव मा, obc नेते वारकरी संप्रदाय चे गणपतराव हातेकर मा, सोनाली ताई गोंडाने जिल्हा संघटिका मा.वैशाली वासनिक सामाजिक कार्यकर्त्या भरतजी नानेट कामठी शहराध्यक्ष मा दीपक जी अंगुले मौदा तालुका अध्यक्ष मा तिकेत मेश्राम विजय डोंगरे मा मुन्ना जी मानवटकर तालुका महासचिव तसेच तसेच मृतक भगिनी कांचन ची आई व भाऊ निर्मलाबाई तळवटकर माव सुशील ठमके कांचन चे मामा व अन्य परिवार प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here