भारतीय सैन्य दलातील जवान संदीप उर्फ चंद्रशेखर भोंडे यांचा वाहन अपघातात दुखःद मृत्यू
भारतीय जवानाचा मृत्यूमुळे जिल्ह्यात शोककळा
✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी “
📱 ८७९९८४०८३८ 📱
📞 ८३०८७२६८५५ 📞
भंडारा :- भंडारा जिल्हा मोहाडी तालुका मौजा डोंगरगाव येथील संदीप उर्फ चंद्रशेखर भोंडे वय ३६ वर्षे यांचा १० मार्च २०२२ रोज गुरुवार ला अनियंत्रित गाडीच्या अपघाताने दुखःद मृत्यू झाला. संदीप हा भारतीय सैन्य दलात जम्मू काश्मीर येथे कार्यरत होता. काल तो आपले कर्तव्य निभवण्या करीता कुपवाडा जिल्ह्यातील मच्छीगण वरुन विलगिकरण केंद्राकडे जात होता. दरम्यान सरकुल्ली येथे अनियंत्रित गाडीचा अपघात झाला, यात संडीपसह पाच जवान गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर १६८ मिलीट्री हॉस्पिटल ड्रगमुल्ला येथे उपचार सुरु होते, उपचारा दरम्यान भंडारा शहरातील संदीप भोंडे या जवानाचा मृत्यू झाला. घरापासून सैन्याचा वारसा लाभलेला संदीप उर्फ चंद्रशेखर भोंडे हा २००८ मध्ये २१ महार रेजिमेंट मध्ये भरती झाला होता. आपली पदोन्नतीची एक – एक पाऊले त्यांनी पादाक्रांत केली.
दिनांक १२ मार्च रोजी त्यांचे पार्थिव देह हा भंडारा येथे आणण्यात आला व त्यांचा अंतिम संस्कार राजकीय विधिवत संम्मानाने करण्यात आला.
२०१६ ला संदीपचा विवाह झाला. त्याला चार वर्षाचा मुलगा आहे. नुकतीच ७५ दिवसाची रजा आटोपून तो ५ मार्च ला आपल्या कर्तव्यावर गेला, तेथून आपल्या पोस्टिंग झालेल्या स्थानी जात असताना वाटेतच जवानांचा झालेल्या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.संदीपच्या शवविच्छेदनाची परवानगी घेण्यासाठी कुटुंबाला फोन करण्यात आले तेव्हा कुटुंबीयांना या दुखःद घटनेची माहिती मिळाली त्याचा मृत्यू देह शनिवारी भंडारा येथे पाठविण्यात आला, व शासकीय इमामात मृत्युदेहावर अंतिम संस्कार राजकीय विधिवत पद्धतीने करण्यात आला. यामुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.