आदिवासी बांधवानी संविधानाच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर उतरावे -डाक्टर पौर्णिमा उराडे यांचे प्रतिपादन.

आदिवासी बांधवानी संविधानाच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर उतरावे -डाक्टर पौर्णिमा उराडे यांचे प्रतिपादन.

आदिवासी बांधवानी संविधानाच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर उतरावे -डाक्टर पौर्णिमा उराडे यांचे प्रतिपादन.

✍ विनोद कोडापे✍
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
📱8380802959📱

कुरखेडा तालुका :तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खरकाडा येथे संविधान जागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डाक्टर नामदेव वसंताबाई भिकाजी खोब्रागडे विभागीय अध्यक्ष बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ गडचिरोली होते.
प्रमुख मार्गदर्शक डाक्टर पौर्णिमा उराडे जिल्हा अध्यक्ष संविधान व मानवअधिकार गडचिरोली
प्रमुख पाहुणे -मा. दयाराम कोडाप जिल्हा अध्यक्ष संविधान व मानव अधिकार संरक्षण आदीवासी विंग गड.
मा. कुळमेथे जिल्हा संघटक
गनिका कोवे मॅडम जिल्हा अध्यक्ष आदिवासी महिला विंग
मा. योगाजी मडावी तालुका अध्यक्ष खरकाडा
मा. नरुले आदी पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

डाक्टर उराडे मॅडम आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या, “माझ्या आदिवासी बांधवानो तुमची आमची संविधानामुळे ओळख आहे. डाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक कष्ट सहन करून संविधानाची निर्मिती करून मानव अधिकार मिळवून दिले. या मानव अधिकारामुळे तुमच्या आमच्या जिनात आमुलाग्र बदल घडून येऊन आमची प्रगती होताना दिसत आहे.ही प्रगतीच मनुवाद्याना अनेक दशकपासून त्यांच्या डोळ्यात खूपत आहे. त्यामुळे आपण सर्व आदीवासी बांधवानी संविधानाच्या संरक्षणा साठी रस्त्यावर उतरावे असे प्रतिपादन केले.

डाक्टर नामदेव खोब्रागडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले,”आदीवासी समाजा च्या प्रगतीसाठी संविधानिक अधिकाराच्या, संविधानिक कायदे व शासन निर्णय यांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासना विरुद्ध आंदोलन उभारण्याची गरज आहे. काही दिवसातच संघटनेच्या मुंबई, नागपूर आधी ठिकाणच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकारी कार्याल,वनविभाग, पंचायत विभाग, ते अन्य विभागात शासन निर्णय यांची अंमलबजावणीसाठी आंदोलन करण्यात येईल अशी ग्वाही कार्यकर्ते यांना संविधान जागृतीच्या कार्यक्रमात दिली.
या कार्यक्रमाचे संचालन योगाजी मडावी यांनी केले.
या कार्यक्रमात परिसरातील व गावातील शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते