कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला सह्याद्री फाउंडेशन ने केली आर्थिक मदत…

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला सह्याद्री फाउंडेशन ने केली आर्थिक मदत…

कोरोणा मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला सह्याद्री फाउंडेशन ने केली आर्थिक मदत...

✍सौ हनिशा दुधे✍
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
97642 68694

बल्लारपूर : -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गडचिरोली जिल्ह्यात जवळ पास साढे सातशे लोकं मरण पावली होती.कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे कोरोनामुळे मृत्यू झाल्याने,त्यांच्या वारसांना अनेक प्रकारच्या अडचणी ला सामोरे जावे लागत होते.इतर परिवारांना जीवन जगण्यासाठी हिम्मत मिळावी याकरिता हीच अडचण समजून सह्याद्री फाउंडेशन नागपूर यांनी अडचणीत असलेल्या कुटुंबाची शोधमोहीम राबवून त्यांना मदत करायचे ठरविले होते.पण अशा कुटुंबांना शोधणे हे जिकरीचे असल्याने सह्याद्री फाउंडेशन यांच्या मदतीला सामाजिक सेवेचा वसा निरंतर राबविणारे विजय श्रृंगारपवार धाऊन आले.सह्याद्री फाउंडेशन आणि विजय श्रृंगारपवार यांनी आपल्या संयुक्त प्रयत्नाने आणि संपर्कात असल्या सामाजिक ग्रुपच्या मदतीने जवळ पास 150 कुटुंब शोधून काढली.सर्व 150 कुटुंबांना मदत मिळविण्यासाठी ऑन लाईन फार्म भरून दिले काही परिवार ची मदत सरळ बॅंक खात्यात जमा करण्यात आले.
आज उर्वरित कोरोणामुळे दुसऱ्या लाटेत मृत्यू झालेल्या 47 लोकांच्या कुटुंबाला प्रती कुटुंब 30 हजाराची आर्थिक मदत सह्याद्री फाउंडेशन च्या वतीने मिळवून दिली आहे. या सर्व कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचे कार्यक्रम गडचिरोली मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नामदेवराव पोरड्डीवार सभागृहात पार पडले.या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेडगे,आपत्ती व्यवस्थापन प्रमुख श्रीकृष्ण रेड्डी , सामाजिक कार्यकर्ते विजय श्रृंगारपवार,सह्याद्री फाउंडेशन चे अध्यक्ष विजय क्षीरसागर,गडचिरोली मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, डॉ.सूर्यप्रकाश गभणे हे उपस्थित होते. सह्याद्री फाउंडेशन तर्फे आर्थिक मदत रुपी मायेचा आधार मिळाल्यामुळे, अनेक लोकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय श्रृंगारपवार यांनी अथक परिश्रम घेतले होते .
कोरोना च्या संसर्गाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत केल्याने सह्याद्री फाउंडेशन चे कौतुक सर्वत्र जनतेतून केले जात आहे.