सरकारी सुविधांपासून वंचीत करावं?

अंकुश शिंगाडे

मो: ९३७३३५९४५०

         सरकारी सुविधा. ह्या सरकारी सुविधा सर्वांनाच मिळत असतात. त्या सुविधा देतांना सरकार विचारच करीत नाही की लोकांचं काय चुकतं. काही सुविधा ह्या मताचे राजकारण करण्यासाठी दिल्या जातात.

           सरकारी सुविधा मिळायला हव्या. परंतू कोणाला? ज्याला खरंच गरज आहे त्यांना. गरजू कोण? जे अर्ज करतात ते की जे करीत नाही ते. यात जे अर्ज करतात झोनमध्ये जावून. ते गरजू नसतातच. खरे गरजवंत लोकं ओळखण्यासाठी त्या त्या व्यक्तीच्या घरापर्यंत जावे. म्हणजे लक्षात येईल की तो खरंच गरजू आहे की नाही. तसं पाहता आता सर्वच जण स्वतः गरजू समजून सरकारला अर्ज करीत आहेत. 

          सरकारनं ह्या सरकारी सुविधा त्या लोकांना द्यायला हव्या. जे अर्ज करीत नाहीत. त्यां सुविधा त्यांना त्यांच्या घरापर्यंत जावून व प्रत्यक्ष शहानिशा करुन द्यायला हव्यात. तसेच त्यांनाही द्यायला हव्यात की जी मुलं आपल्या मायबापाची सेवा करतात. 

         आज तसा विचार केल्यास मायबापाच्या सेवेची वानवा आहे. कोणीही मायबापाची सेवा करायला पाहात नाही. धजत नाहीत. त्यांना त्रास देत असतात पदोपदी. कोणी कोणी तर त्यांना हाकलूनही देत असतात. त्यातच काहीकाही महाभाग आपल्या मायबापांना वृद्धाश्रमातही टाकत असतात. यात गरीब आणि कमी शिकलेलीच मंडळी नाही तर ब-याच शिकलेल्या मंडळींचाही समावेश होतो. आज ज्या वयात म्हाता-या लोकांना नातवंडासोबत खेळावंसं वाटतं. त्या वयात ती मंडळी नातूसुखापासून वंचीत होतात. 

            म्हाता-यांनाही वाटतं की आम्हाला आमच्या सुनेच्या हातची चटणी रोटी मिळावी. परंतू ती सून जेव्हा घरात येते. तेव्हा सतत भांडणं होत असतात. अशातच त्यांची रवानगी जेव्हा वृद्धाश्रमात होते. तेव्हा ते वृद्धाश्रम त्यांना एका तुरुंगापेक्षा लहान वाटत नाही. 

          विशेष गोष्ट अशी की यामध्ये सरकार अशा वृद्धाश्रमात राहणा-या लोकांना पेन्शन म्हणून पैसा देतं. वृद्धाश्रमाला अनुदान देतं. कारण की अशा वृद्धांची व्यवस्थीत सोय व्हावी. बरोबर आहे सरकारचं. वृद्धाश्रमाला हातभार लागावा म्हणून ही सोय. परंतू हे अनुदान वा ही पेन्शन त्या वृद्ध लोकांसाठी ठीक आहे. ज्यांना या जगात कोणीच नाही. ही सुविधा त्या लोकांसाठी नसावी की ज्यांना मुलबाळं आहेत.

           महत्वाचं सांगायचं म्हणजे ज्यांना मुलंबाळं आहेत व ज्यांनी आपलं कर्तव्य न करता आपल्या मायबापांना घरातून हाकलून दिले. त्यांच्या मुलांकडून अनुदानाचा हा पैसा व त्यांना देण्यात येणा-या पेन्शनचा पैसा जबरन वसूल करावा. तसंच त्यांना कोणत्याही सुविधांचा लाभही देवू नये. असे जर झाले तर उद्या कोणताच मुलगा वा मुलगी आपल्या मायबापांना वृद्धाश्रमात टाकणार नाही वा मायबाप प्रत्यक्षपणे वृद्धाश्रमात राहायला तयार होणार नाहीत. 

           आज वृद्धाश्रमाची कैफियत पाहता वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे. कारण त्या मुलांनी काहीही केले तरी त्यांना माहीत आहे की त्यांचं कोणीही काही बिघडवत नाही. त्यांनी मायबापांना वृद्धाश्रमात पाठवलं तरी त्यांना कोणीही काही म्हणू शकत नाही. सरकार तर नाहीच नाही. म्हणून ते पाठवतात आपल्या मायबापांना सर्रासपणे वृद्धाश्रमात. परंतू जर यामध्ये ज्यां मुलांनी मायबापांना घरातून हाकलून दिले, त्या मुलांना मिळणा-या सरकारी सुविधा बंद झाल्या आणि त्या मायबापांना मुलांनी हाकलून दिल्यावर जर त्यांना मिळणारी पेन्शनही मुलांच्याच खिशातून वसूल केली गेली तर बरीच मुलं सुधरतील व कोणीही मायबापांना हाकलून देणार नाही. वृद्धाश्रमाचीही संख्या कमी होईल. परंतू सरकारही ते ऐकत नाही व अशा मुलांना देत असलेल्या सुविधाही बंद करीत नाही. 

           महत्वपुर्ण वस्तुस्थिती ही की मुलांना मायबाप जन्म देतात. उन्हातून सावलीत नेतात. मोठे करतात. ते मायबाप आपले कर्तव्य पुर्ण करतात. परंतू मुलं काय करतात. ते आपले कर्तव्य विसरुन आपल्या मायबापांना घरातून हाकलून देतात. ही वास्तवता आहे. म्हणजेच ज्या काळात मुलांनी मायबापांना आधार द्यायला हवा. त्या काळात मायबापांना आधार मिळत नाही. मुलं मी आणि माझी पत्नी व माझी मुलं असा उद्देश धरुन वागतात. 

         महत्वाचं सांगायचं म्हणजे आपल्या मायबापांनी आपल्याला वाढवलेलं असून जीवन जगण्यासाठी योग्य बनवलं आहे. तेव्हा आज म्हातारपणी मायबापांना आपल्या मदतीची गरज आहे. आपण त्यांचे काही देणे लागतो. त्यांनी तर आपले कर्तव्य केले काल. आज आपल्याला आपले कर्तव्य पार पाडायचे आहे. सरकारी सुविधा मिळो की न मिळो. कारण आपल्याला त्यांनी लहानाचे मोठे करतेवेळी सरकारी सुविधा पाहिल्या नाहीत. तेव्हा आपणही तसा विचार न करता आपल्या मायबापाची सेवा करावी. जेणेकरुन आपले मायबाप कृतार्थ होतील. जर अशी कृती आजचे पाल्य करणार नाहीत तर उद्या काळ बदलायला वेळ लागणार नाही. उद्या काळ बदलताच सरकारही तसे निर्णय घेतील. जे निर्णय प्रत्येक मुलांच्या नाकातूनच पाणी काढणारे असतील यात शंका नाही. कारण मायबाप देवापरसही मोठे आहेत. त्यांनीच आपल्याला देवधर्म आणि दानवधर्मही शिकवलेत. हे तेवढंच खरं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here