H3N2 विषाणू पसरत आहे काळजी घ्या! मास्कचा वापर करा, घाबरू नका
रमेश कृष्णराव लांजेवार
मो.नं.9921690779
वाढत्या हवामानातील बदलामुळे देशासह जगात वेगवेगळे आजार व विषाणू नव्याने निर्माण होत आहे त्यातुनच एच3एन2निर्माण झालेला आहे.सर्दी,तीव्र खोकला, ताप, अंगदुखीची लक्षणे असलेल्या एच3एन2 प्रकारातील शीतज्वराने(इन्फ्लुएझा) ने देशात दोन लोकांचा मृत्यू झाला यामुळे चिंता वाढली आहे. ही साथ महाराष्ट्रसह देशभरात सुरू आहे.या साथीमुळे कर्नाटक व हरियाणामध्ये प्रत्येक एक रूग्ण दगावल्याचे सांगितले जाते.
2 जानेवारी ते 5 मार्च या कालावधीत देशात एच३एन२चे 451 रूग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.एच3एन2 चा वाढता प्रादुर्भाव पहाता सर्वांनीच आपल्या प्रकृतीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.एच3एन2च्या शीतज्वरामध्ये श्वसनास त्रास होतो.याशिवाय खोकला, सर्दी व तापही येतो. अंगदुखी, मळमळ, उलट्या,अतिसाराचा त्रास जाणवतो. ही लक्षणे साधारण आठवडाभर राहतात.मात्र काही जणांना अधिक कालावधीपर्यंतही त्याचा त्रास होतो यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
दमा, डायबेटिस, ह्रृदयरोग, कमकुवत प्रतिकारशक्ती, मेंदू संबंधित आजार असलेल्यांच्या प्रकृतीमध्ये एच3एन2 गुंतागुंत निर्माण करून धोका होऊ शकतो.त्यामुळे एच3एन2 च्या आजारांपासून सर्वांनीच सावध रहाने गरजेचे आहे. जगभरात दरवर्षी विशिष्ट कालावधीत शीतज्वराची साथ पसरते.भारतात दरवर्षी जानेवारी ते मार्च व पावसाळ्यानंतर शीतज्वराचा आजार पसरतो.परंतु सध्या असलेली साथ मार्च अखेर ओसरेल असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.परंतु एच3एन2 ची साथ पहाता सर्वांनीच आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावीच व घराच्या बाहेर निघतांना किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर अवश्य करावा.यामुळे एच3एन2 पासून बचाव होईलच सोबत वाढत्या प्रदूषणापासून आपल्याला आपले आरोग्य वाचविण्यासाठी मोठी मदत होईल.
एच3एच2 हा व्हायरल फ्लू आहे.परंतु याची लक्षणे करोनाप्रमाणेच असल्याने आरोग्य मंत्रालयाची चिंता वाढली आहे.ताप, खोकला, सर्दी,शरीरदुखी, मळमळ, उलट्या, किंवा जुलाब ही या विषाणूंची प्रमुख लक्षणे आहेत.यापासुन बचाव म्हणून गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर व्हायलाच हवा.कारण एच3एन2 संसर्गाने सध्याच्या परिस्थितीत चिंता वाढविली आहे.देशात एच3एन2चा धोका पहाता केंद्रीय आरोग्य मंत्रालय,करोना कृती दल, केंद्रीय आरोग्य सचिव, राज्य आरोग्य अधिकारी यांच्यात शनिवारला महत्वपूर्ण बैठक पारपडली म्हणजे आरोग्य मंत्रालय एच3एन2 च्या बाबतीत अलर्ट मोड असल्याचे दिसून येते.त्यामुळे एच3एन2 पासून बचावाकरीता करोना काळातील संपूर्ण दिशानिर्देशाचे पालन नागरिकांनी करावे असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
एच3एन2 च्याबाबतीत इंडियन मेडिकल असोसिएशनने सूध्दा एक पत्रक जारी करतांना म्हटले आहे की एच3एन2 व्हायरसमध्ये खोकला कमीत कमी तीन आठवड्यापर्यंत रहातो.यामुळे रूग्ण हैराण होत आहेत.खोकला जात नाही म्हणून ॲन्टिबायोटिक्स औषधे घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या अशा सुचना इंडियन मेडिकल असोसिएशनने केल्या आहेत.त्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगुन परिस्थितीनुसार आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी व सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.खोकला,तापाने देश बेजार,यामुळे पसरत आहे
एच3एन2 ची साथ, काळजी घ्या!
कारण करोनाप्रमाणे पसरत असलेल्या एच3एन2 विषाणूच्या संसर्गाने दोन जनांचा मृत्यू झाल्याने देशाचे टेंशन वाढले आहे.लोकांनी एच3एन2 आजाराला घाबरून जाऊ नये.परंतु आपल्या आरोग्याची काळजी प्रत्येकाने अवश्य घेतली पाहिजे.मुख्यत्वेकरून लहान मुले व वृद्धांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.आरोग्य सांभाळा सुदृढ रहा.