तिरोडा तालुका व तिरोडा शहर युवक काँग्रेस कार्यकर्ता मेळावा संपन्न. तालुक्यातील युवकांनी काँग्रेस मध्ये केला प्रवेश

तिरोडा तालुका व तिरोडा शहर युवक काँग्रेस कार्यकर्ता मेळावा संपन्न.

तालुक्यातील युवकांनी काँग्रेस मध्ये केला प्रवेश

तिरोडा तालुका व तिरोडा शहर युवक काँग्रेस कार्यकर्ता मेळावा संपन्न. तालुक्यातील युवकांनी काँग्रेस मध्ये केला प्रवेश

प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
मो.9834486558

गोंदिया (तिरोडा ): – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा इथे दिनांक 11/3/2024 ला तिरोडा तालुका व तिरोडा शहर युवक कार्यकर्ता मेळावा घेण्यात आले, त्यात तालुक्यातील युवकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला,या मेळाव्याचे आयोजन सौरभ चौहान अध्यक्ष तिरोडा शहर युवक काँग्रेस, पवन मोरे अध्यक्ष तिरोडा शहर काँग्रेस, ओम पटले संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा, डॉ.निम्रोध पटले अध्यक्ष विधान सभा क्षेत्र,यांनी केला, या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार दिलीपभाऊ बनसोड आणि श्री जिचकार महासचिव प्रदेश युवक काँग्रेस कमिटी तसेच श्री अश्विन बैस सचिव प्रदेश युवक काँग्रेस कमिटी यांनी युवकांना मार्गदर्शन केले.या युवक काँग्रेस च्या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून जगदीश एरोला अध्यक्ष गोरेगाव तालुका, पंचभाई अध्यक्ष भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी, राधेलाल पटले सर प्रदेश प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, लक्ष्मीनारायण दुबे, जे. पी. पटले पंचायत समिती सदस्य तिरोडा हे उपस्तित होते.
आज च्या युवक मेळाव्याच्या प्रसंगी माजी आमदार दिलीपभाऊ बनसोड यांनी युवकांना समबोधित करताना आज या देशात मोदी सरकार आणि त्याचे उपक्रम हे नवयुकांचे कशा प्रकारे नुकसान करीत आहेत तसेच देशात रोजगार, महागाई,आणि आप आपसात जातीभेद निर्माण करण्याचे काम देशातील सरकार कशी करीत आहे या बद्दल त्यांनी प्रकाश टाकला, शेतकऱ्यावर होत असलेला अत्याचार शेतकऱ्यानी घेतलेल्या कर्जावर 6% व्याज लावून त्यांच्यावर एकप्रकारे मोदी सरकार दडपशाही करीत असल्याचे त्यांनी सांगितले,देशाचे नेते राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत सौरभ चौहान यांच्या नेतृवात तालुक्यातील युवकांना दिलीपभाऊ बनसोड यांनी दुपट्टा घालून प्रवेश दिला, कार्यक्रमाचे संचालन प्रवीण शेंडे यांनी केला तर आभार प्रदर्शन डॉ. निम्रोध पटले यांनी केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here