नगरपंचायत अधिकाऱ्यांचा काम कमी व तोरा जास्त, झलक दिखला जा.......? नगर विकास संघर्ष समिती मोहाडी, जशास तसे उत्तर देणार

नगरपंचायत अधिकाऱ्यांचा काम कमी व तोरा जास्त, झलक दिखला जा…….?

नगर विकास संघर्ष समिती मोहाडी, जशास तसे उत्तर देणार

नगरपंचायत अधिकाऱ्यांचा काम कमी व तोरा जास्त, झलक दिखला जा.......? नगर विकास संघर्ष समिती मोहाडी, जशास तसे उत्तर देणार

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞

भंडारा : ( मोहाडी ) भंडारा जिल्ह्यातील तालुका स्थळी असलेली मोहाडी नगर पंचायतीने घर टॅक्स मध्ये अमाप वाढ करून नगरवासीयावर अन्याय केलेला आहे. घर टॅक्स मुद्दा तापलेला असताना नगर पंचायतीचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संघनमत करून एक नवीनच प्रकार सुरू केलेला आहे. नगर पंचायत घर टॅक्स वसुली जबरदस्ती करीत असुन, लोकांच्या घरी जाऊन धमक्या देत आहेत. नागरिकांचे व्हिडियो स्वतःच शोसल मीडियावर वायरल करून नागरिकांची अब्रू वेशीवर टांगण्याचा काम करीत आहे. जनतेला अपील अर्ज करायला सांगीतले, लोकांनी ते सुद्धा केले, मग अजुन पर्यंत अपिलाचा निर्णयच झाला नाही , अपिल निकाली काढल्या शिवाय नगर पंचायतीला टॅक्स घेण्याचा अधिकार नाही. जनतेवर थकीत बील नाही, नगर पंचायत ने फक्त एक महिन्या आधी बील वाटप सुरू केले, कित्येक लोकांना अजुन पर्यंत घर टॅक्स बिलच मिळाला नाही. कर मागणी बील मुदत ३१ मार्च नियमानुसार आहे. त्या आधी जनतेवर शक्ती करणे,धमक्या देणे , शोसल मीडियावर व्हिडिओ वायरल करणे असे कृत्य नगर पंचायत करीत आहे. या विरोधात दिनांक १२ मार्च १०२४ रोजी मोहाडी पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे .कर मागणीचे नोटीस दिल्याशिवाय जनतेवर कार्यवाही करण्याचे फरमान सोडणारा तो अधिकारी कोण? असा प्रश्न पडतो आहे.
नगरपंचायत सर्रास कायद्याची पायमल्ली करून, जनतेला कायदा शिकविनाऱ्यांनी अगोदर अध्यक्ष,उपाध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका कडून घर टॅक्स वसुली करून ती यादी प्रसिद्ध करावी. नंतरच जनतेकडे जावून टॅक्स मागणी करावी.
नगर पंचायतीचे अधिकारी आपल्या हिटलरशाही ने “काम कमी व तोरा जास्त… झलक दिखला जा… ” दाखवून जनतेला परेशान करीत आहेत.
जनतेला वेठीस धरने बंद करा अन्यथा ” नगर विकास संघर्ष समिती जशास तसे उत्तर देणार ” असल्याचा इशारा खुशाल कोसरे, बबलू सैय्यद, पुरूषोत्तम पात्रे,अनिल न्यायखोर, श्याम चौधरी, सुभाष भाजीपाले,आदर्श बडवाईक, भुमेश्र्वर पारधी, रवि पाटील,भगवान पवनकर, सलीम भाई शेख, बबलू शेख, रमेश गोंनाडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिला आहे. मोहाडी नगरवसियांचे या कडे विशेष लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here