जागतिक महिला दिनानिमित्त वायु युध्द सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण वसंतराव नाईक महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी घेतला प्रत्यक्ष अनुभव. विद्यार्थिनींना स्वरक्षण करता आले पाहिजे कराटे, वायु युध्द, लाठीकाठी, याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.. सॅन्सई अविनाश मोरे

जागतिक महिला दिनानिमित्त वायु युध्द सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण

वसंतराव नाईक महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी घेतला प्रत्यक्ष अनुभव.

विद्यार्थिनींना स्वरक्षण करता आले पाहिजे कराटे, वायु युध्द, लाठीकाठी, याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.. सॅन्सई अविनाश मोरे

जागतिक महिला दिनानिमित्त वायु युध्द सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण वसंतराव नाईक महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी घेतला प्रत्यक्ष अनुभव. विद्यार्थिनींना स्वरक्षण करता आले पाहिजे कराटे, वायु युध्द, लाठीकाठी, याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.. सॅन्सई अविनाश मोरे

✍️-संतोष उध्दरकर. ✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा:म्हसळा शहरातील वसंतराव नाईक महाविद्यालय येथे जागतिक महिला दिनानिमित्त चॅम्पियन्स कराटे क्लब म्हसळा यांच्या माध्यमातून वायु युध्द सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, हे शिबीर क्लबचे सेन्साई अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेऊन अनेक महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी या शिबिरात सहभागी होऊन प्रत्यक्ष अनुभव घेता आला, लाठीकाठी, कराटे, वायु युध्द, स्वताचे रक्षण कसे करायचे याचे अचुक मार्गदर्शन मोरे यांनी विद्यार्थिनींना केले, महिलांवर होणारे वाढते अत्याचार पाहता या सर्व गोष्टी आत्मसात करणे आवश्यक आहे, सरकारने स्री शक्ती कायदा देखील अमलात आणला आहे, मुलींना, महिलांना स्वरक्षण करता आले पाहिजे या साठी आम्ही चॅम्पियन्स कराटे क्लब म्हसळा यांच्या वतीने या प्रकारे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येतात, महिलांनी किंवा मुलींनी कोणत्याही प्रकारचे अत्याचार सहन करू नका त्याला लढण्यासाठी दोन हात करण्याची तयारी ठेवा असे क्लबचे सेन्साई अविनाश मोरे यांनी शिबिरामध्ये विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले,. सदर प्रशिक्षणासाठी संस्थचे विद्यार्थी नीरजा धोत्रे, निर्मई करडे, श्रावणी नांदगावकर, सिया तांबे, श्रेता वर्मा, विक्रांत खांडेकर, आयुष शिगवण, मयुर तांबे, आर्यन तांबे, गौरव पवार हे हजर होते व क्लबच्या विद्यार्थ्यांनी कराटेचे वेगवेगळे प्रकार सादर करून तसेच मुलींना स्वतचे रक्षण कशा पद्धतीने करता यायला पाहिजे याचे देखील प्रात्यक्षिक करून दाखविले.यावेळी प्रशिक्षण शिबिरात क्लबचे सेन्साई अविनाश मोरे,संस्थेचे अध्यक्ष अभय कलमकर,प्राचार्य,सर्व शिक्षकवृंद व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनीं उपस्थित होते.तसेच सदर प्रशिक्षण सर्व मुलींसाठी खूप प्रेरणादायी ठरेल असे मत महाविद्यालयाच्या प्राचार्यनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here