उमरेडचा *कचरा* झाला

उमरेडचा *कचरा* झाला

उमरेडचा *कचरा* झाला

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो 9096817953

उमरेड :- एक आठवड्यापासून शहरातील कचऱ्याचा लोचा सुरू आहे. घरातला कचरा घरात. नाहीतर दुसऱ्याच्या दारात. घरोघरी ही गंभीर समस्या आपल्या सर्वांसाठी त्रासदायक ठरत आहे. आतापर्यंत या विषयावर चार बातम्या झाल्यात. कुणीही ओरडायला तयार नाही. बोलायला तयार नाहीत. प्रश्न मांडायला तयार नाही. प्रशासनाला कुणीही जाब विचारण्याच्या भानगडीत पडत नाही. आपल्याला कचरा इतका प्रिय झाला कसा? नगर पालिकेच्या निवडणूका कुणालाच लढायच्या नाहीत का? शहराचे नेतृत्व मूग गिळून असणाऱ्यांच्या हातात आम्ही द्यायचे का? तुम्ही पेटून का उठत नाही? दोनचार महिला, माणसं नगर पालिकेत जावून कचऱ्याच्या गाड्या आमच्या घरापर्यंत येत होत्या आता अचानक का येत नाही, असा जाब आपण का विचारत नाही? सोसल मिडियावर दिल्लीतल्या, जातीपातीच्या, धर्माच्या, नको त्या गप्पा करायच्या अन गावात, घरोघरी कचरा. आतापर्यंत दुसऱ्या गावात कचरा आंदोलन झाले असते. नगर पालिकेच्या आंगणात कचरा नेवून फेकला असता…चलो नगरपालिका…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here