शाश्वत पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी कर वसुली गरजेची - डॉ.अर्जुन गुंडे माझी वसुंधरा व जल जीवन मिशन कार्यशाळा संपन्न

शाश्वत पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी कर वसुली गरजेची – डॉ.अर्जुन गुंडे

माझी वसुंधरा व जल जीवन मिशन कार्यशाळा संपन्न

शाश्वत पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी कर वसुली गरजेची - डॉ.अर्जुन गुंडे माझी वसुंधरा व जल जीवन मिशन कार्यशाळा संपन्न

ज्ञानेश्वर तूपसुंदर
नासिक तालुका प्रतिनिधी
मो. 8668413946

नाशिक :- जलजीवन मिशन व माझी वसुंधरा अभियान या दोन्ही योजना लोकसहभागाच्या असून यामध्ये लोकांचा सहभाग आवश्यक आहे. शाश्वत पाणी पुरवठा करणेसाठी नियमित पाणी पट्टी वसुली होणे आवश्यक आहे यासाठी महिला बचत गटांकडून पाणीपट्टी वसुलीसारखा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने माझी वसुंधरा अभियान व जलजीवन मिशन अंतर्गत आज कॉलेज रोड जवळील गुरुदक्षिणा सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक दीपक पाटील आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. अर्जुन गुंडे यांनी पूर्ण झालेली पाणी पुरवठा योजना ताब्यात घेताना गावाने सर्व उपांगाबाबत व्यवस्थित माहिती घेऊन व खात्री करूनच योजना ताब्यात घ्यावी. तसेच किमान एक महिना ठेकेदाराकरून योजनेची पूर्व चाचणी करून घ्यावी, पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना सर्व घटकांबाबत अवगत करावे, पाणी पुरवठा योजना पूर्ण होत असताना त्यासाठी किती पाणीपट्टी लागणार आहे याचाही अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच प्राध्यापक श्रीकांत सोनवणे यांनी जल संधारण, देखभाल दुरुस्ती पाणी बचत, पाण्याविषयक जनजागृती याबाबत मार्गदर्शक केले.
कार्यक्रमास गट विकास अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता, शाखा अभियंता,सरपंच, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतचे डेटा ऍन्ट्री ऑपरेटर,ग्राम स्वच्छता समिती सदस्य आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here