१५ ते २४ मार्च दरम्यान आजाद समाज पार्टी चीं युवा संवाद यात्रा

१५ ते २४ मार्च दरम्यान आजाद समाज पार्टी चीं युवा संवाद यात्रा

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994

गडचिरोली :- बहुजन नायक कांशीरामजी व क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीच्या निमित्ताने आजाद समाज पार्टी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात युवा संवाद यात्रेचे आयोजन करून शिक्षण, आरोग्य, रोजगार व भ्रष्टाचार या चार मूलभूत प्रश्नांवर युवकांशी संवाद साधणार आहे. ही यात्रा १५ मार्च पासून तर २४ मार्च या दरम्यान असणार असून पक्षाचे पूर्व विदर्भ सचिव धर्मानंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष राज बन्सोड तथा जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांच्या नेतृत्वात हि यात्रा जिल्ह्यात फिरणार आहे.

जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्नांना घेऊन यात्रेत जनतेशी, युवकांशी संवाद साधून व समस्या जाणून घेणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. त्यानंतर हे प्रश्न घेऊन प्रशासनापुढे मांडणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली.

यात्रा दोन टप्यात निघणार असून १५ मार्च ला सुरु होऊन पोटेगाव, पोट, एटापल्ली १६ ला एटापल्ली भामरागड, पेमिली, आलापल्ली १७ मार्च ला अहेरी, सिरोचा, १८ ला आष्टी व चामोर्शी असा मार्ग असेल. व २१ मार्च पासून दुसरा टप्पा पेंढरी, धानोरा, येरकड २२ मार्च ला मालेवाडा, कोरची २३ ला पुराडा, कुरखेडा, २४ ला वळधा, वडसा, आरमोरी या मागे बात्रा गडचिरोली मध्ये येऊन समारोप होईल.

पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष राज बनसोड, जिल्हा प्रभारी विनोद मडावी, धर्मानंद मेश्राम यांच्यासह आझाद पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.