सिंदेवाही परिक्षेत्रातील तिघांना वनपदके बहाल

सिंदेवाही परिक्षेत्रातील तिघांना वनपदके बहाल

✍️जितेंद्र नागदेवते ✍️
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
मो 8806689909

सिंदेवाही :- महसुल व वनविभाग शासन निर्णय क. एफएसटी-11/24 प्र.क. 167/फ-दि. 11.03.2025 रोजी वन सेवेतील वनसंरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दल तसेच वन सेवेत उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय पदके जाहीर करण्यात आली. त्यामध्ये, वन व वन्यर्ज संरक्षण या कार्यप्रकारात सन 2020-21 या कालावधीसाठी सुनिल यादव बुल्ले, वनप यांना रजत पदक, वन व वन्यजीव संरक्षण या कार्यप्रकारात सन 2021-22 या कालावधीसा स्वप्नील विजयराव बडवाईक, वनरक्षक यांना सुवर्ण पदक व वन व वन्यजीव संरक्षण य कार्यप्रकारात सन 2022-23 या कालावधीसाठी नितेशकुमार दिलीप शहारे, वनरक्षक यांना रजत पदक, बहाल करण्यात आले आहे. पदक बहाल करण्यात आलेला कालावधी वरील तिनही वन कर्मचारी हे सिंदेवाही (प्रादे.) वनपरिक्षेत्रात कार्यरत होते. नाविण्यपुर्ण कामाचे स्वरूप, गोपनिय अहवाल, सचोटी, चारित्र्य, तांत्रिक कार्यक्षमता, बुध्दीमत्ता व त्यांनी विकसीत केलेले तंत्रज्ञान इ. बाबींचा विचार करून मा. प्रधान सचिव वने यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय पदक निवड समिती ने शिफारस केलेल्या अधिकारी/कर्मचा-यांना पदक बहाल केले आहे.

सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मानव व वन्यप्राणी संघर्ष, वन वन्यजीव संरक्षण, वन-वन्यजीव संवर्धन कामी मिळालेल्या पदक प्राप्त तिनही कर्मचारी यांना वनपरिक्षेत्र अधिकारी, सिंदेवाही, क्षेत्र सहाय्यक, नवरगांव/सिंदेवाही/तांबेगडी मेंढा / गुंजेवाही तसेच परिक्षेत्रातील सर्व वन कर्मचा-यांकडून अभिनंदन व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.