माथेरान नगर परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त माता पालक क्रीडा स्पर्धा व महिला सन्मानाचे आयोजन..
✍🏻 श्वेता शिंदे ✍🏻
माथेरान शहर प्रतिनिधी
मो.8793831051
माथेरान :- जागतिक महिला दिनानिमित्त माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्यामंदिर शाळेत माता पालकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि. 12 रोजी करण्यात आले होते.या कार्यक्रमा प्रसंगी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल इंगळे वैद्यकीय अधिकारी डॉ.रुपाली मिसाळ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा ज्योती शिंदे,लेखापाल अंकुश इचके,भारत पाटील, नेहा साखळकर ,अभियंत्या करुणा बांगर,मुख्याध्यापक दिलीप आहिरे,प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका विदुला गोसावी आदी मान्यवर उपस्थिती होते.
जागतिक महिला दिनानिमित्त माता पालक वर्गासाठी विविध मनोरंजनात्मक खेळांसह स्पर्धा घेऊन विजेत्या माता पालक वर्गातील प्रथम क्रमांक शबाना जहीर महापुळे, द्वितीय क्रमांक अंजना पांडुरंग झोरे तसेच तृतीय क्रमांक अर्पिता अमर शिंदे यांना रोख रक्कम व चषकासह मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आलीत तसेच वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थिनींनी भारतीय इतिहासातील महान महिला जसे सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ,माता रमाई, झाशीची राणी, मदर टेरेसा, लता मंगेशकर तसेच शिक्षिका, डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी,गृहिणी दिव्यांग भगिनी यासारखे स्त्रीयांची विविध रूपे दाखवणारे नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. विद्यार्थिनींच्या या नृत्य सादरीकरणासाठी माधुरी बिरामणे या शिक्षिकेने विशेष मेहनत घेतली होती.
माथेरानमध्ये विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या महिलांचा देखील यावेळी माथेरानचे मुख्याधिकारी तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अंगणवाडी सेविका सुरेखा बाबूलाल जमदाडे आणि माथेरान रिगल हॉटेल व्यवस्थापक हर्षाली अनिल बोराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली मिसाळ यांचा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम 2500 रुपये देऊन विशेष गौरव करण्यात आला.त्याच बरोबर हिरकणी माता सन्मान व तिन्ही शाळांमधील महिला शिक्षिकाचा सन्मान करताना मुख्याध्यापिका विदुला गोसावी, शिक्षिका श्रद्धा रामाने तसेच अंगणवाडी शिक्षिका स्मिता गायकवाड,तर मातांचा सन्मान करताना वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्यामंदिर शाळेतील वीरेन या विद्यार्थ्यांची आई अंजना झोरे तसेच मनुजा या विद्यार्थिनीची आई ज्योती शिंदे यांचे पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानात वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्यामंदिर शाळेचा प्रथम क्रमांक येण्यामागे माथेरान नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांचे मोठे योगदान असल्याने शाळा व्यवस्थापन समिती, शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंदांच्या वतीने येतोचित सन्मान करण्यात आला.यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या शाळेचे शिक्षक संतोष चाटसे यांनी केले होते.
