अमरावती विमानतळाला मिळाला डीजीसीआयकडून एरोड्रम परवाना

अमरावती विमानतळाला मिळाला डीजीसीआयकडून एरोड्रम परवाना

अमरावतीवरुन उड्डाणाचा मार्ग मोकळा

मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक ✍🏻
मो. 9860020016

अमरावती :- सविस्तर माहिती पुढील प्रमाणे अमरावती विमानतळाला हवाई उड्डाणासाठी आवश्यक असलेला परवाना डीजीसीएकडून प्राप्त झाला आहे.
त्यामुळे आता अमरावती विमानतळावरुन हवाई उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला आहे. अलायन्स एअरचे अमरावती-मुंबई-अमरावती असे विमान त्यामुळे या महिनाअखेरीस पासून धावणार आहे.

डीजीसीएचे हे प्रमाणपत्र प्रातिनिधीक स्वरुपात एमएडीसीच्या एमडी स्वाती पांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोपविले.