कोरोना लस अभावी भरपुर लसीकरण केंद्र बंद.

48

वर्धा जिल्हात कोरोना लस अभावी भरपुर लसीकरण केंद्र बंद.

12 केंद्रातूनच फक्त लसीकरण.

कोरोना लस अभावी भरपुर लसीकरण केंद्र बंद.
कोरोना लस अभावी भरपुर लसीकरण केंद्र बंद.

✒प्रशांत जगताप,प्रतिनिधी✒
वर्धा,दि.13 एप्रिल:- वर्धा जिल्हात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरस वाढत असल्याचे समोर येत आहे. दुसरी कडे जिल्हात कोरोनावर लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जात आहे. पण लसीचा साठा नसल्याने भरपुर केंद्रावरील लसीकरण बंद असल्याचे समोर आले आहे.

वर्धा जिल्ह्यात हर रोज दहा हजार पर्यंत लोकांना लसीकरण देण्यात येत होते. मात्र वर्धा जिल्हात कोरोना वायरस वर असलेल्या लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने फक्त दहा ते बारा केंद्रातच लसीकरण सुरू असल्याचे अनेका कडुन सांगण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने वर्धा जिल्हात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा लसी नागरिकांना देण्यात येत आहे. पण, लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने हळूहळू अनेक केद्रांवरील लसीकरण बंद होऊ लागले. लसींचा साठा संपलेल्या अंदाजे 75 केद्रांतील लसीकरण प्रक्रिया पुर्णत ठप्प झाली आहे.