माझी माय
माझी माय

माझी माय
लेखक/कवी देवानंद भाऊ

माझी माय

हंबरुन वासराले।चाटती जव्हा गाय
तवा मले तिच्या मंधी। दिसते माझी माय।।धृ।।
आया बाया सांगत होत्या।व्हतो जेव्हा मी तान्हा।।
दुष्काऴात मायच्या माझे । आटला होता पान्हा ।।
पिठा मधी पाणी टाकून ।मले पाजत जाय।
तव्हा मले पिठा मधी। दिसती माझी माय।।1।।
काट्या कुट्या वेचायला।माय जाई रानी ‌।
पायात नसे वाहन तिच्या।फिरे अनवाणी।।
काट्या कुट्या काही तीच मानत नसे पाय
तवा मले काट्या मधी।दिसती माझी माय।।2।।.
बाप माझा रोज लावी ।मायच्या मांग टुमणं
बस झाल शिक्षण आता। हाती घेऊ दे काम
शिकून शान कुठ मोठा।मास्तर होणार हाय।।
तवा मले मास्त मधी।दिसली माझी माय।।3।।.
दारु पिऊन मायले मारी।जवा माझा बाप
थर थर कापे अन लागे तिले धाप
कसायाच्या दावणीले।बांधली जशी गाय।।
तव्हा मले गाई मधी।दिसते माझी माय।।4।।
बोलता बोलता।एकदा तिच्या डोऴा आलं पाणी
सांग राजा म्हणे मले।कव्हा दिसल राणी
भरल्या डोऴ्यात।कव्हा पाहील दुधावरची साय।।
तव्हा मले सायी मधी।दिसती माझी माय।।5।।
म्हणून म्हणतो आनंदात।भरावी तुझी ओटी
पुन्हा एकदा जनम घ्यावा।माय तुझ्या पोटी
तुझ्या चरणी ठेवून माथा।धराव तुझ पाय।।
तव्हा मले पायी मधी।दिसती माझी माय।।6।।

हंबरुन वासराले।चाटती जव्हा गाय
तवा मले तिच्या मंधी। दिसते माझी माय..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here