आमदार ,बंटी भाऊ भांगडिया यांच्या स्वनिधीतून आणि ग्रामपंचायत बाळापूर बूज. यांच्या संयुक्त विद्यमाने बोरवेलचे लोकार्पण.
अरुण रामुजी भोले
नागभीड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड :–तालुक्यातील बाळापुर बुज येथे बस स्टॉप चौकात उन्हाळ्याचे दिवस असल्याने अत्यंत पाणी टंचाई असल्यामुळे पिण्याचे पाणी करिता जनतेला इतरत्र भटकंती करावी लागत असल्यामुळे जनतेची समस्या लक्षात घेता बोरवेल खोदकाम करिता येथील सरपंच श्री प्रशांत दिलीप कामडी यांनी क्षेत्राचे आमदार श्री बंटी भाऊ भांगडीया यांना विनंती केली. बस स्टॉप चौक येथे बोरवेल खोदकाम करून देण्याची बंटी भाऊ यांनी त्यांची विनंती मान्य करीत बंटीभाऊ यांनी लगेच दुसऱ्या दिवशी बोरवेल खोदकामा करिता गाडी पाठवून बोरवेल खोदकाम करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी बंटीभाऊ यांचे आभार मानले.
भाजपा तालुकाध्यक्ष श्री संतोष भाऊ रडके तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री अवेश पठाण यांचे मार्गदर्शनात आज दिनांक ११/०४/२०२२ ला बोरवेल चे लोकार्पण करण्यात आले यावेळी सरपंच श्री प्रशांत दिलीप कामडी. ग्रामपंचायत सदस्य रामप्रसाद कुंभरे. जिल्हा परिषद प्रमुख श्री धनराज बावनकर. बूथ अध्यक्ष श्री मनोहर जी चल्लीरवार. श्री विलासरावजी मोहुरले. गुरुदास सयाम. दिवाकर ढोरे. मुखरू शिंपी. शुभम पत्रे. लक्ष्मणजी गुरनुले. किशोर बावनकर. निलेश गुरनुले. रुपेश फुकट होम राज वाडगुरे ग्रामपंचायत चपराशी सूर्यकिरण कावळे. भूपेश बावनकर. रामदास गुरनुले. अशोक महाडोळे. संगम ठाकरे. बंडू गुरनुले लिलाबाई गुरनुले भाजपा पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.