नदीच्या काठावर पिस्टलची ट्रायल घेण्यासाठी केले फायर आणि भिंग फुटले
पोलिसांच्या सतर्कतेने वाचला एकाचा जीव एक आरोपी अटकेत एक आरोपी फरार
✍ त्रिशा राऊत✍
नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो.(9096817953)
नागपूर : एखाद्या गुन्ह्याचा छडा लागला की कानून के हाथ लंबे होते है.या डॉयलॉगला साजेसे काम नागपूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखा पोलिसांनी केले आहे. त्यांनी दाखवलेल्या सावधगिरीमुळे एक हत्या रोखण्यात यश आले आहे. नागपूर ग्रामीणमधील सिलेवाडा तामसवाडी परिसरात एकाने दुसऱ्याची हत्या करण्यासाठी पिस्टल विकत घेतली. त्या पिस्टलची ट्रायल घेण्यासाठी नदीच्या काठी त्याने फायर केले आणि त्याचे भिंग फुटले. नदीच्या काठी केलेल्या फायरची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू असून श्रीकांत नारनवरे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे. तर दुसरा आरोपी हा फरार आहे.
हिवाळी राजधानी
महाराष्ट्राची हिवाळी राजधानी तर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूर शहराची ओळख आहे. त्याचबरोबर ऑरेंज सिटी म्हणून नागपूर शहराचीही ख्याती आहे. त्याचबरोबर या शहराची आता नवी ओखळ निर्माण होत असून येथे गुन्हेगार वाढत आहेत. राजरोस येथे गुन्हे होत आहेत. दिवसाढवळा अनेकांचे मुडदे पडत आहेत. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेतच. त्याबरोबर माहिती मिळताच ते गुन्हेगारांच्या मुसक्याही आवळत आहेत. अशीच कामगिरी नागपूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखा पोलिसांनी केली आहे.
नदीकाठावर ओपन फायर
नागपूर ग्रामीणमधील सिलेवाडा तामसवाडी परिसरात एका एका चोरीच्या घटनेचा तपास पोलिस करत होते. त्यावेळी जवळच्या नदीकाठावर ओपन फायर करण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यावेळी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ त्या ठिकाणी छापा मारला. त्यावेळी तेथे श्रीकांत नारनवरे नावाच्या व्यक्तीच नाव समोर आलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्या घरची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरात एक माऊजर आणि 5 जिवंत काडतुसे मिळून आली.
एकाला संपविण्यासाठीच पिस्टलची खरेदी
दरम्यान नारनवरे याची पोलिसांची अधीच चौकशी केली असता त्याने सागर सहारे, प्रतीक चवरे यांची नावे सांगितली. तसेच ते पिस्टल सहारे आणि चवरे यांच्याकडून घेतल्याचेही त्याने सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी प्रतीक चवरेलाही ताब्यात घेतलं. त्याच्याकडेही अधीक चौकशी केली असता त्याने सांगितलं की कृष्णा यादव नावाच्या व्यक्ती सोबत त्यांचा वाद आहे. त्याला संपविण्यासाठी हे माऊजर मागविला आहे. मात्र हे वेपन कुठून आणलं याची माहिती सागर सहारे यालाच असून तो सध्या फरार असल्याचे समोर येत असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. तर पोलिसांनी आपल्या कर्तृत्व शैलीमुळे एक हत्या होण्यापासून वाचविली आहे. मात्र अशा आरोपींना शस्त्र मिळतात तरी कुठून याचा शोध घेण्याची गरज असल्याचे नागरिक म्हणत आहेत.