तुमसर येथील माकडे नगरात एका तरुणाची केली निर्घूण हत्या
आरोपी झाले पसार, फरार आरोपी पकडण्यात पोलीस स्टेशन तुमसरचा अपयश
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838
तुमसर :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात माकडे नगर येथे दिनांक १२ एप्रिल २०२२ रोज मंगळवार ला सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान नामे मोदग्लायण उर्फ मोनू विनू गेडाम वय २७ वर्षे रा. आंबेडकर वार्ड तुमसर असे मृत व्यक्तीचे नाव असून मारेकरी घटना स्थळावरून फरार झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की मृतक युवक हा व्यवसायाने टॅटू बनवीणे व स्वताची सलून चालवीण्याचा व्यवसाय करत होता. दिनांक १२ एप्रिल रोजी सायंकाळी दुकान सुरु करण्याकरीता दुकानाजवळ आला व नास्ता करण्याकरीता दुसऱ्याच्या दुकानात गेला. पण नास्ता करता करता अज्ञात हल्लेखोरांनी डोळ्यामध्ये मीरची पावडर टाकून पाठीवर व मानेवर धारदार शस्त्रांनी वार केला. कसातरी आपला जिव वाचवित मोदग्लायण उर्फ मोनू माकडे नगरातील गल्ली मध्ये पळत असतांना काही मारेकरी विरुद्ध दिशेने येऊन पुन्हा वार करूण पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात मोदग्लायण तिथेच तडपत मृत्यु पावला. सदर घटनेची माहिती तुमसर पोलीस स्टेशन ला मिळताच पोलीसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. पण तुमसर शहरामध्ये मार्केट असल्यामुळे रस्त्यावर नागरीकांची चांगलीच गर्दी दाटली. परंतू सायंकाळच्या भर उजेडात नागरिकांसमोर शस्त्राच्या धारदार हत्याराने हल्ला झाल्याने शहरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हत्येची माहिती सोशल मीडियावरून पसरल्याने नागरीकांची गर्दी वाढली. व नेमकी हत्या कोणत्या कारणासाठी आणि कुणी केली.? हे मात्र स्पष्ट झाले नाही.
मृतक मोदग्लायण हा माकडे नगरच्या जवळच एका कॉम्प्लेक्स मध्ये काही दिवशा आधीच टॅटू काढणे व सलून ची दुकान खोलून आपला व्यवसाय चालवीत असे. परंतू अचानक हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याने परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ग्रामिण रुग्णालय तुमसर येथे पोस्टमार्टम करण्याकरिता पाठवीले. सध्या तुमसर पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध तपास व कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. अज्ञात आरोपीचे शोध घेणे सुरु आहे.
पुढील तपास तुमसर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शणात सुरु आहे. तुमसर शहरात गत काही वर्षापासुन गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढले असून मारहानीच्या घटना नेहमीच घडत असल्याने भितीचे वातावरण तुमसर तालुक्यात खुनापर्यंत पोहचले आहेत.