वेजगावात दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन, २००८ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता
वनविभागाने त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी
राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
चंद्रपूर: गोंडपिपरी तालुक्यातील वेजगाव, आर्वी, तोहोगाव, सरांडी या परिसरात वाघाने धुमाकूळ घालून १५ जनावरांचा बळी घेतला आहे. वेजगावात नागरिकांना दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून २००८ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
मागील पाच ते सहा दिवसापसून गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव, वेजगावात आणि आर्वी परिसरात वाघाने धुमाकूळ घातला असून वाघ भरदिवसा गावात येऊन जनावरांवर हल्ला करीत आहे. तोहोगाव येथील गो शाळेमध्ये असलेल्या दहा जनावरांवर हल्ला करून ठार केले आहे. तर आर्वी येथील दोन म्हशी सुद्धा ठार केल्या आहे. वेजगाव येथे बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारस नागरिकांना गावाशेजारी वाघ दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घराबाहेर व शेतात जाणे बंद केले आहे. वाघाचा बंदोबस्त करणे गरजेचे असतांना वनविभागाकडून कोणतीही कारवाई होतांना दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
वाघाचा बंदोबस्त वेळेत न केल्यास वेजगावामध्ये २००८ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वाघाचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.