शेकडो हेक्टर उन्हाळी धान फसल विद्युत लोडसेडींगमुळे संकटात
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838
मोहाडी :- भंडारा जिल्हा मोहाडी तालुका अंतर्गत येणारे मौजा मांडेसर खमारी(बृ,) परिसरात बारमाही वाहणारी सुर नदी क्षेत्रात व विहिर, बोअरवेल चे साधन पारडी चिचखेडा खोडगाव रामपूर मांडेसर खुडसावरी चोरखमारी पिंपळगाव खमारी बुज.असलेले शेकडो शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे, हलका स्वरूपाच्या उन्हाळी धान असून तो निसवन्याच्या तयारीत आहे अशा परिस्थितीमुळे धानाला जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता असतो, परंतु ऐनवेळी महावितरणच्या भारनियमामुळे शेतीला पुरेसे पाणी मिळत नसल्याने आणि उन्हाळ्याच्या कडक तापमानामुळे धानाच्या बांध्यामध्ये भेगा पडल्या असून अशा परिस्थितीमध्ये महावितरणच्या शेतकऱ्यांना आठ तास मिळणारी विद्युत सहा तास करण्यात आली व त्यात विद्युत ट्रिप मुळे कसेबसे चार तास मिळतात या चार तासात ओलीत होत नाही अशा गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात आलेली धानची फसल वाळत आहे. यात शेतकऱ्यांना लाखों रूपयांचा फटका बसणार आहे. अशा परिस्थितीत मोहाडी महावितरण कंपनीने मांडेसर खमारी फिडरवर दहा तास विद्युत देण्यात यावे अशी मागणी दुर्योधनअटराहे यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी केली आहे.