राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवार संवाद यात्रा महाड येथे संपन्न
✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९
महाड(रायगड):-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या आदेशाने गडचिरोली पासून सुरू झालेली परिवार संवाद यात्रा मराठवाडा, विदर्भ, कोकण पर्यंत दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक महाड येथे संपन्न झाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, महाराष्ट्र युवती अध्यक्ष सक्षणा सलगर, पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, रायगड युवती जिल्हाध्यक्षा सायली दळवी, रायगड युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांची उपस्थिती होती यावेळी खा. सुनील तटकरे म्हणाले पवार साहेबांचे उत्तुंग नेतृत्व असताना कार्यकर्त्यांनी जोमाने काम केले पाहिजे मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना महाड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच जागा कोल्हापूर मधील एक जागा तेव्हा एक नंबरचा पक्ष होता जयंत पाटील साहेब आपण जलसंपदामंत्री असल्याने महाडला पुरापासून वाचवण्यासाठी आपल्याकडून नागरिकांना अपेक्षा आहेत तसेच महाड येथील प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
पालकमंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना व आत्ता पालक मंत्री असताना पक्षसंघटना वाढीसाठी जिल्ह्याचा वारंवार दौरा करून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन तेथील सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम करीत असते महाड साठी जास्तीचा निधी देऊन अधिक जनतेचे प्रश्न अडचणी मार्गी लावण्याचे काम करू त्यासाठी कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेणे गरजेचे आहे अशा प्रकारचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना केले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात म्हणाले की दिल्ली येथे भाजप सरकार आल्यापासून महागाईचा भस्मासुर झाला आहे गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत मनमोहन सिंग यांच्या काळात आत्ताच्या पन्नास टक्के दर होते कामगार कायद्यात सुद्धा बंधने आणली गेली शेतकरी विरोधी कायदे आणले गेले श्रीलंके मध्ये फार कठीण परिस्थिती आहे तशा प्रकारची परिस्थिती भारतात सुद्धा चालू झालेली आहे अशातच ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, घोटाळे धाडी टाकणे यामुळे मूळ विषयापासून जनतेला बाजूला ठेवण्याचे काम केले जात आहे सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष नाही यासाठी कार्यकर्त्यांनी जागरूक राहणे गरजेचे आहे यावेळी महाड तालुक्यातील शिवसेनेच्या व काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाड, पोलादपूर, माणगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते