महिलांसाठी प्रशासनाने जाहीर केला महत्त्वाचा निर्णय, शेती क्षेत्रात प्रगती करण्यास महिलांना मिळणार मोठी संधी

प्रफुल मदणकर

कृषी उद्योजक

कुठल्याही देशाच्या आर्थिक विकास करण्यामध्ये महिलांचा मोलाचा वाटा आहे.कृषी क्षेत्रात ५५% पेक्षा जास्त महिलांचे योगदान आहे.तसेच यासाठी कृषी क्षेत्रातील कृषी उत्पादक कंपन्यांशी त्यांना सलग्न करणे अती आवश्यक असून यासाठी आता शासनाने महिलांसाठी एक नवीन शासन निर्णय जारी केला आहे.

यामध्ये एखाद्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे शेती असेल व त्याची नोंद सातबारा उतारा वरील असेल तर त्या कुटुंबातील इतर सदस्यांना शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद होण्याकरिता शेतकरी असल्याचा ‘ शेतकरी दाखला ‘ देण्यात येईल.आजपर्यंत महिलांना शेतामध्ये काम करीत असताना सुध्दा त्यांच्या नावे शेती नसल्यामुळे ‘ शेतकरी उत्पादक कंपनीचे कार्यकारी मंडळामध्ये सदस्य होण्यासाठी ‘ शेतकरी होण्याचा दाखला ‘ मिळण्यास अडचणींना सामोरे जावे लागत होते.परंतु आता त्यांना ही अट नसणार आहे. व त्यांना यात सहभागी करून घेण्यात येणार आहे.

हा खूप महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याने शेतकरी महिला स्वतंत्ररीत्या शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करून उत्कृष्टरित्या कार्यभार सांभाळू शकणार,त्यांना नेतृत्व करण्याची जवाबदारी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here