प्रशासनाच्या निष्काळजी धोरणाविरोधात जिल्ह्यातील आदीवासी कोळी समाजाला न्याय मिळण्यासाठी समाज बांधवासोबत 25 एप्रिल पासून बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण करणार – सौ गितांजली कोळी

जितेंद्र कोळी

पारोळा प्रतिनिधी

मो: 9284342632

धुळे जिल्ह्यातील आदीवासी कोळी ढोर कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी, कोळी महादेव जमात बांधवाच्या पुर्वी च्या इंग्रजांनी लिहीलेल्या 1950 पुर्वी च्या “कोळी “नोंदीमुळे धुळे जिल्ह्यातील प्रांताधिकारी सबब सांगून जिल्ह्यातील आदीवासी अ.सु.जा. यादीतील क्र.28,29,30 या कोळी ढोर, टोकरे कोळी,मल्हार कोळी,महादेव कोळी यांच्या शेकडो विद्यार्थ्यांना, बांधवांना सरसकट सर्वांचा ST जातीचा दावा अवैध ठरवून प्रमाणपत्र देत नाहीत व खान्देशात कोणताही समुद्र नसतांना खान्देशातील कोळ्यांना SBC चे प्रमाणपत्र देण्याचा घाट घालतात हा प्रचंड मोठा अन्याय अधिकारी आदीवासी कोळी बांधवांवर करत असून आदीवासी कोळींना अनुसूचित जमातीचे दाखले देण्यापासून वर्षानुवर्षे वंचित ठेवल्या मुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे .

यासाठी न्याय मागण्यांसाठी दि.15फेब्रूवारी 2023 रोजी धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो आदीवासी कोळी जमात बांधवांच्या वतीने महाआक्रोश मोर्चा आयोजन करण्यात आले होते .परंतु मोर्चा झाल्यावर नंतर दोन महिने उलटून गेल्यावरही अजूनही जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितल्या प्रमाणे समाजबांधवांचे प्रश्न सुटावेत म्हणून प्रांताधिकारी यांची मिटींग लावली नाही या शासनाच्या दुर्लक्षीत व अन्यायपूर्ण धोरणाविरोधात लवकरात लवकर मिटींग लावून संपूर्ण जिल्ह्यातील आदीवासी कोळी बांधवांना विनाअट शपथपत्रावर सुलभतेने जातीचे ST चे दाखले व वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी

धुळे येथे संपूर्ण जिल्ह्यातील आदीवासी कोळी जमात बांधवांना न्याय मिळण्यासाठी कोळी समाजाची रणरागिणी कार्यकर्ता सौ. गितांजली ताई कोळी जेलरोड धुळे येथे दि.25 एप्रिल सकाळी 10 वाजेपासून बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला बसणार आहेत. तरी या प्रसंगी जिल्ह्यातील समस्त कोळी बांधवांना एकत्र यायचं आव्हान त्यांनी केलं आहे.

 

उपोषण कर्ते: 

सौ. गितांजली कोळी ,धुळे

सौ. शोभा ठाकरे, धुळे

श्री हिराभाऊ वाकडे ,शिरपूर

श्री अमोल कोळी ,आनंदखेडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here