महाविकास आघाडी आणि भाजपमधे मैच फीक्सींग – ॲड. बाळासाहेब आंबेडकर
• चंद्रपूरच्या सभेत वंचितची तोफ कडाडली
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 13 एप्रिल
मागील १० वर्षात भारतातील १६ लाख हिंदू कुटुंब भारताचे नागरीकत्व सोडुन गेले हे नरेंद्र मोदी का सांगत नाहीत. या देशाला हिंदु राष्ट्र बनविन्याच्या मोदी बाता करतात. मात्र मागील १० वर्षात १६ लाख परिवार भारत देशाचे नागरीकत्व सोडुन इतर देशाचे नागरीकत्व का स्विकारत आहेत याची माहीती मात्र नरेंद्र मोदी देत नाहीत. असा घणाघात गुरुवार, 11 एप्रिल रोजी सत्ता परिवर्तन सभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी केला. चंद्रपुर-वणी-आर्णि लोकसभेचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ ते चंद्रपुर येथे आले होते. या देशात ब्लॅकमेलींगचे राजकारण सुरू असुन ते लोकशाहीसाठी घातक असल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडीचे आणि भाजपाचे मैच फीक्सींग आहे, हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी दिलेल्या उमेदवारावरून दिसते. याचे उदाहरण त्यांनी दिले. नागपुरला काँग्रेसच्या उमेदवाराला आम्ही पाठींबा दिला तर नाना पटोले यांना मिरच्या का झोंबतात असा सवालही त्यांनी यावेळी केला. यावेळी मंचावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, पक्ष प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग, पुर्व विदर्भ प्रमुख रमेशकुमार गजभे, ओबीसी नेते बालमुकुंद भिरड, शैलेश जुमडे, राम हरणे, रविंद्र जुमडे, मंगेश खाटीक, विजय पोहनकर, सोमाजी गोंडाने, कविता गौरकार, बंडु ढंगरे, सतिश खोब्रागडे, तनुजा रायपुरे, शुभम मंडपे, मधु वानखेडे, मधुकर उराडे, अक्षय लोहकरे, विशेष निमगडे, हर्षवर्धन कोठारकर, मोनाली पाटील, पि. डब्लु मेश्राम, सुभाष ढोलने, सुभाष थोरात, आदी उपस्थित होते.
चंद्रपुर वणि आर्णी लोकसभा क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना ६ महीन्यांच्या आत नोकरी न लावुन दिल्यास राजीनामा देईन असे राजेश बेले म्हणाले. ओबीसी जनगणना, वसतिगृह बांधुन देण्यासाठी आपण कायम प्रयत्नशिल राहु, जटपुरा गेट येथिल वाहतुक कोंडी लवकरात लवकर सोडवण्यात येईल, स्थानिक बेरोजगारांना ८०% रोजगार, प्रत्येक तालुक्यात व सर्व शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येईल, लोकसभा क्षेत्रातील प्रदुषण मुक्ती साठी प्रयत्नशिल राहु, वन जमीनीवर वर्षानुवर्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मालकी हक्क देण्यास प्रयत्नशिल राहु, शिक्षणाच खाजगीकरण नष्ट करण्याकरीता संसदेत आवाज उठवु, जिर्ण अवस्थेत असलेल्या शाळेच्या इमारतींचे नुतनिकरन करू, लोकसभा क्षेत्रातील सर्व शासकीय रुग्णालये अद्ययावत करू असे राजेश बेले यांनी सांगितले.
यावेळी या सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करून इथल्या सत्ता वंचितांना सत्तेत नेऊन त्यांना सत्ताधारी बनविणे हाच वंचितचा मुख्य उद्देश असल्याचे वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी सांगीतले.
कोरपना तालुक्यातील कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनीमीत्ताने काढण्यात येणाऱ्या वर्गनीतुन ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी निधी सुपुर्द केला. कार्यक्रमाचे संचालन जयदिप खोब्रागडे यांनी केले.