लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता जास्तीत जास्त लोकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे.- -तहसीलदार श्रीम.स्वाती पाटील

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ करिता जास्तीत जास्त लोकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे.- -तहसीलदार श्रीम.स्वाती पाटील

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता जास्तीत जास्त लोकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे.- -तहसीलदार श्रीम.स्वाती पाटील

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ करिता जास्तीत जास्त लोकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे.- -तहसीलदार श्रीम.स्वाती पाटील

✒️-किशोर पितळे-तळातालुका प्रतिनीधी ✒️९०२८५५८५२९

तळा :- तळा तहसील कार्यालयामार्फत स्थापन केलेल्या स्वीप पथका अंतर्गत शुक्रवार दिनांक १२ मार्च २०२४ रोजी तळा तालुक्यातील पिटसई बोरभाटला आदिवासी वाडी येथे मतदार जनजागृती रॅलीआयोजित करण्यात आली होती.यावेळी तहसीलदार श्रीमती स्वाती पाटील उपस्थित होत्या.तसेच मंडळ अधिकारी समिरा खाडे,तलाठी शामली सातांबेकर,तलाठी रामदास भौड, तलाठी अंकिता झाडे,मुख्याध्यापक वाळुंजकर सर,पोलीस पाटील धर्मा कातुर्डे,अंगणवाडी सेविका मयुरी अडखळे यावेळी रॅलीत उपस्थित होते. यावेळी विध्यार्थ्यांनीपथनाट्याच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचे महत्त्वपटवूनदिले.स्वीपपथकां तर्गत ही मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता जास्तीत जास्त लोकांनी मतदानप्रक्रियेतसहभागी व्हावे.लोकशाहीने दिलेला अधिकार हक्क बजवावा.इतरांना सांगावे. शासनाने,प्रशासनानेदिव्यांगांना मतदान करता यावे यासाठी देखीलमतदान केंद्रात जाण्या येण्याची सोय केली आहे.कोणीही मतदानापासून वंचीत राहू नये असे आवाहन तहसीलदार श्रीम. स्वाती पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले. संपूर्ण देशभरात निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जास्तीत- जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. भारतातील लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांना अधिक महत्त्व आहे.हेशालेय विद्यार्थ्यांनीपथनाट्याद्वारे मतदारांनासमजावून सांगितले.तसेच मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी नैतिकदृष्ट्या त्यांना प्रवृत्त केले.यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला.तसेच तहसीलदार, श्रीमती स्वातीपाटील यांनी मतदार बंधू-भगिनींना मतदान जनजागृतीच्या संदर्भात मार्गदर्शन केले.तसेच स्वीप पथकास प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.