सांबरी येथे आरोग्य शिबीर संपन्न
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- यशवंत महादेव पाटील पी.एन.पी. इंग्लिश मीडियम स्कूल सांबरी पी.एन. पी. एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी चित्रलेखा पाटील, संचालक श्रुती सुतार, कॉर्डिंनेटर राजश्री पाटील यांच्या संकल्पनेतून तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशन यांच्या माध्यमातून लायन्स क्लब ऑफ डायमंड अलिबाग, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था, माणुसकी प्रतिष्ठान यांच्या सहकार्यातून नुकतेच जागतिक आरोग्य दिवसाचे औचित्य साधून सांबरी येथे आरोग्य शिबिर तपासणी तसेच तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यानिमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये अनुक्रमे वैष्णवी पिंगळे, सारा कोठेकर,सलोनी पिंगळे , आदिती पाटील ,यश थळे, लावण्या घरत, श्वेता पाटील ,आराध्या धनंजय शिंदे , स्मित पिंगळे आणि सिद्धार्थ ठाकूर या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विजेत्या स्पर्धकांना तेजस्विनी फाउंडेशनच्या सौजन्याने उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक मेडल प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी प्रयास हॉस्पिटल, तेजस्विनी फाऊंडेशन विश्वस्त पदाधिकारी तसेच लायन्स क्लब ऑफ डायमंड अलिबाग अध्यक्षा डॉ. रेखा राजेंद्र म्हात्रे, डॉ. संपदा कोळी (BDS), मुख्याध्यापिका मेधा दुबे, तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाऊंडेशन अध्यक्षा जीविता सुरज पाटील, माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान, उज्वल भविष्य सामाजिक संस्था अध्यक्षा उज्ज्वला भालचंद्र चव्हाण चंदनशिवे इ.मान्यवर मंडळी तसेच यावेळी श्वेता जुईकर, प्रियांका पाटील, प्रीती भिंगारे, सोनल पाटील, भाग्यश्री जाधव, पूजा चवरकर, सुविधा पिंगळे, मनस्वी सहस्त्रबुद्धे, सुचिता पाटील, मोनिका पाटील, सिद्धी पाटील, सौजन्या नाईक तसेच संध्या पाटील इ. शिक्षक व शिक्षकेतर वर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.