हिंगणघाट संयुक्त प्रयत्नाने अपघातात मरण पावलेल्या मिल कामगाराच्या कुटुंबियाला मिळाली पाच लाखांची तात्काळ मदत.

प्रशांत जगताप, प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि.13मे:- हिंगणघाट तालुक्यातील वणी येथील गिमाटेक्स इंडस्टीज च्या समोर मिल मधील कामगार श्री स्व. आकाश मुन वय २८वर्ष रा. वणी, हल्ली मुक्काम आदर्श नगर हिंगणघाट याचा सकाळी ७.३० वाजता हैदराबाद नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर हैदराबाद येथुन मध्य प्रदेश येथे धानाची पँडी घेवून जाणारा ट्रक अनियंत्रित झाल्यामुळे टक खाली दबून अत्यंत दुर्दैवीपणे जागेवरच मृत्यू झाला व त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आमदार समिर कुणावार, कामगारनेते व हिंगणघाट बाजार समिती सभापती अँड. सुधीर कोठारी, माजी आमदार राजुभाऊ तिमांडे, इंटुक सरचिटणीस आफताब खान, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसीलदार श्रीराम मुंदडा, कंपनीच्या वतीने फँक्टरी मँनेजर शाकीर पठाण व ठाणेदार संपत चव्हाण, कामगार प्रतिनिधी व मृतक कामगाराचे कुटुंबिय यांची हिंगणघाट येथील उपविभागीय कार्यालयात बैठक पार पडली.

चार तास चाललेल्या मँराथान चर्चेनंतर बैठक यशस्वी होवून सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने मृतक कामगारांच्या कुटुबियांना गिमाटेक्स कंपनी, वणी व्यवस्थापनाच्या वतीने पाच लाखांची तात्काळ मदत देण्यात आली तसेच मृतक कामगाराच्या पत्नीला व मुलीला पेंशन व इंशुरन्स लाभ, मय्यती करीता 15000 ते 20000 ची मदत तसेच टक मालक व कामगारांच्या वतीने सुद्धा मदतीचे आश्‍वासन देण्यात आले. मृतक कामगाराच्या कुटुंबामध्ये त्याची पत्नी, तीन वर्षाची मुलगी व आई आहे. यावेळी संपूर्ण वणी गाव व कंपनीतील कामगार मोठ्या संख्येने कंपनी बंद पाडण्याकरीता जमा झाले होते. परंतु पोलिसांच्या समयसूचकतेमुळे पुढील अनर्थ टळला. वरील सर्व मान्यवरांचे उपस्थितीत पाच लाखाचा चेक व इतर कंपनीतर्फे लाभांचे लेखी आश्वासन मृतक कामगाराच्या कुटुंबियांना देण्यात आले. मृत कामगाराला न्याय मिळवून दिल्याबद्दल सर्व कामगाराच्या वतीने कुटुंबियांच्या वतीने सर्वाचे आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here