माढेळी येथील पोलीस कर्मचारी अवैध दारू तस्करांचे मित्र व निरपराध आदिवासी बांधवाचे शत्रु.

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
वरोरा :- वरोरा तालुक्यातील माढेळी येथील पोलीस चौकीमधील पोलीस कर्मचारी हे अवैध दारू तस्करांना अभय देऊन दारू विक्रीची चालना देत आहे. गेल्या काही वर्षांपासून चंद्रपूर जिल्हा दारू बंदी असताना सुद्धा माढेळी, वडगाव, येवती, खरवड,आशी, नीलजई, आमडी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू तस्करांची दारू विक्री चालू आहे. ह्या सगळ्या बाबी पोलिसांच्या निदर्शनास येऊन सुद्धा, कोविड मुळे संचार बंदी असताना पोलीस कर्मचारी अवैध दारू तस्कराकडून महिना वसुल करून दारू विक्रीला आणि दारू विक्रेत्याला चालना देत आहे. आणि निरपराध गरीब लोकांवर दारू विक्रीचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना आर्थिक व मानसिक दृष्ट्या प्रताडीत करण्यात येत आहे. तसेच माढेळी पोलिस कर्मच्याऱ्याना वरोरा येथिल पोलिस निरीक्षक यांचा सुधा पाठींबा आहे. संचारबंदी लागु असताना दारूबंदी जिल्ह्यात एवढया मोठ्या प्रमाणात दारु साठा येथे चालु आहे हा माल कसा येत आहे? असा प्रश्न जनसामान्यांत चर्चेचा विषय झाला आहे , ज्या पोलीस कर्मचार्यांवर कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याचि जबाबदारी आहे तेच पोलीस जर भ्रष्ट प्रवरुतीने असेच वागत राहिले तर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते कन्हैया सालोरकर यांनी प्रहार स्टाईल ने आंदोलन करणार असा इशारा दिला आहे व भ्रष्ट पोलीसांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करनार असे बोलले आहेत. व या विषयावर मा. आ. बच्चूभाऊ कडू यांचे सोबत सुधा त्यांनी चर्चा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here