जळगाव जिल्हात कोरोना संसर्गाचा धोका पाहता साकळी येथील भवानीदेवीचा यात्रोत्सव रद्द.
जळगाव जिल्हात कोरोना संसर्गाचा धोका पाहता साकळी येथील भवानीदेवीचा यात्रोत्सव रद्द.

जळगाव जिल्हात कोरोना संसर्गाचा धोका पाहता साकळी येथील भवानी देवीचा यात्रोत्सव रद्द.

जळगाव जिल्हात कोरोना संसर्गाचा धोका पाहता साकळी येथील भवानीदेवीचा यात्रोत्सव रद्द.
जळगाव जिल्हात कोरोना संसर्गाचा धोका पाहता साकळी येथील भवानीदेवीचा यात्रोत्सव रद्द.

✒️किरण माळी यावल तालुका प्रतिनिधी✒️
यावल:- जळगाव जिल्हातील यावल तालुक्यातील साकळी मध्ये कोरोना या महाभयंकर आजाराचा धोका पाहता जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार प्रतिबंधक उपाययोजना म्हणून साकळी येथील अक्षयतृतीया निमित्त होणारे दोन दिवसीय पारंपारिक धार्मिक यात्राउत्सव व इतर गर्दीचे धार्मिक विधी रद्द करण्यात आलेले आहे. त्यामुळे भाविक भक्तांनी सदर दोन्ही दिवशी गर्दी करू नये.साकळी सह पंचक्रोशीतील भाविक भक्त नागरिकांनी आपल्या सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनास सहकार्य करावे.असे आवाहन संबंधित मंदिर प्रशासनाच्या व आयोजक ग्रामस्थांच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे.

ग्रामदैवत भवानीमातेचा दि.14 रोजी व थोर संत हरदुलाला यांचा दि 15 रोजी अक्षयतृतीय निमित्त होणारा यात्रात्सोव व इतर गर्दीचे धार्मिक उत्सव रद्द करण्यात आलेले आहे. तसेच यादरम्यान प्रामुख्याने होणारा बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी दोघ धार्मिक ठिकाणी शासनाच्या प्रतिबंधक उपाययोजनेच्या नियमानुसार सोशल डिस्टन्स पाळण्याच्या दृष्टीने मोजक्याच भाविक भक्तांच्या उपस्थितीत ग्रामदैवत भवानी देवीचा विधीवत अभिषेक- पूजाअर्चा केली जाणार आहे. मागील वर्षी सुद्धा कोरोना आजाराच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन ग्रामदैवत भवानीमाता तसेच थोर संत हरदुलाला यांच्या उत्सवा प्रित्यर्थ होणाऱ्या बारागाड्या व इतर धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले होते. त्यानुसारच नागरिकांची गर्दी होणार नाही यादृष्टीने यंदाचा वर्षीसुद्धा दोघं ठिकाणचे बारा गाड्या उत्सव व इतर धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेली आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या ग्राम दैवत भवानीमाता व संत हरदुलाला यांचा यात्रा उत्सव गेल्या सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा यात्रा उत्सव रद्द करण्याची वेळ आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here