आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंबा पिकाचे उत्पादन

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंबा पिकाचे
उत्पादन

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंबा पिकाचे उत्पादन

📰मीडिया वार्ता न्यूज📰
संदिप जाबडे – पोलादपूर तालुका प्रतिनिधी
मोबाईल – 8149042267

पोलादपूर तालुक्यातील अनेक शेतकरी प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जात असून अनेक शेतकरी शेती मध्ये विविध प्रयोग करत आहेत त्यात त्यांना यश येत असून शेतीमधील आमुलाग्रह बदल उत्पादनसह रोजगारात वाढ होत आहेत

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्या लगत असलेल्या सडवली येथील निवृत्त पोलिस शेतकऱ्यांने आंबा पिकाचे भरघोस उत्पादन घेतले श्री नामदेव कृष्णा जाधव मुंबई पोलीस मध्ये नोकरी करत असताना तालुका कृषी अधिकारी पोलादपूर कार्यालयाच्या सहकार्याने मौजे सडवली गावांमध्ये आंबा या पिकाची लागवड करण्यात आली होती परंतु अपुऱ्या मशागतीमुळे त्यांना दरवर्षी अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळाले नाही मे 2021 पासून तालुका कृषी अधिकारी पोलादपूर कार्यालयातील कृषी सहाय्यक श्री अनिल वलेकर यांच्या मार्गदर्शनाने श्री जाधव यांनी खत व्यवस्थापन करण्याचे ठरवले
जून 2021 मध्ये नवनियुक्त कृषी पर्यवेक्षक श्री भरत कदम यांच्या मार्गदर्शनाने जून 2021 मध्ये बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या शिफारशीप्रमाणे खत व्यवस्थापन करण्यात आले तसेच ऑगस्ट 2021 मध्ये शिफारशीप्रमाणे कल्टार चा उपयोग करण्यात आला सदर व्यवस्थापनाने श्री जाधव यांच्या बागेला नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये चांगला मोहोर आला सदर बागेला विद्यापीठाच्या वेळापत्रकाप्रमाणे फवारणी देखील करण्यात आली व श्री जाधव या शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबा फळाची काढणी चालू केली व सदर फळाची विक्री मुंबई व पोलादपूर परिसरात मध्ये चांगल्या प्रकारे चालू आहे श्री जाधव यांच्या सहकार्याने गावातील इतर शेतकऱ्यानी देखील या वर्षी कल्टार चा वापर करून आपल्या बागेतून चांगले उत्पादन घेतले. अशाच प्रकारे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक यांचे कडून तालुक्यातील शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घेऊन आपल्या बागेतून भरघोस उत्पादन घ्यावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री एन.वाय.घरत यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here