पारडी येथे बनणार देशातील पहिले स्मार्ट पोलिस स्टेशन…

त्रिशा राऊत

नागपूर ग्रामीण प्रतिनिधि

मो 9096817953

१३मे,नागपूर: नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या पारडी येथील पोलिस स्टेशनचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी १२ मे रोजी आभासी पद्धतीने भूमिपूजन झाले.याप्रसंगी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, मोहन मते, प्रवीण दटके, टेकचंद सावरकर, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ संदीप बिष्णोई, नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी उपस्थित होते.

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत क्षेत्राधिष्ठीत विकास या घटकाखाली मौजा पारडी, भरतवाडा, पूनापूर व भांडेवाडी क्र. १, येथील १७३० एकर क्षेत्राकरिता प्रारुप व प्राथमिक नगर रचना परियोजना शासनामार्फत मंजूर करण्यात आली आहे. शासनामार्फत मंजूर प्राथमिक नगर रचना परियोजने अंतर्गत मौजा पुनापूर : मधील नगर भूमापन क्रमांक १५० (पै.), १७३ (पै.) व मौजा भांडेवाडी मधील नगर भूमापन क्रमांक २३७ (पै.) या भूखंडावर, अंतिम भूखंड क्र. ३१० पोलिस स्टेशन / फायर स्टेशन’ हे आरक्षण दर्शविण्यात आले आहे. लोकहितार्थ उक्त आरक्षणाखालील १७,०८७ चौ. मी. (४.२२ एकर) जमिनीचा ताबा खालील जमीन मालकांमार्फत नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमीटेड (NSSCDCL), नागपूर

यांना विनामोबदला दिल्याबद्दल आभारपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रसन्न दिलीप ढोक, विनय श्यामसुंदर सारडा व इतर आणि अनिलकुमार रामप्रताप सारडा व इतर यांना देण्यात आले. तसेच प्रकल्पाचे कंत्राटदार देवेन पाडगल यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सदर प्रकल्प १२,१६० वर्ग मीटर मध्ये तयार होणार असून त्याला तळमजला व त्यावर २ मजले राहतील. प्रकल्पासाठी एकूण ९,३३,५८,८२० रुपये निधी प्रस्तावित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here