अपघातात दुचाकीस्वार पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर दुचाकीही जळाली चिमूर-कान्पा मार्गावरील घटना

अपघातात दुचाकीस्वार पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर दुचाकीही जळाली चिमूर-कान्पा मार्गावरील घटना

अपघातात दुचाकीस्वार पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर

दुचाकीही जळाली
चिमूर-कान्पा मार्गावरील घटना

अपघातात दुचाकीस्वार पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर दुचाकीही जळाली चिमूर-कान्पा मार्गावरील घटना

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 13 मे
तेंदूपत्ता संकलन करून गावाकडे परतणारे दुचाकीस्वार व चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. हा अपघात भयावह असल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर, पत्नी गंभीर जखमी झाली. अपघातानंतर दुचाकीनेही पेट घेतला. ही थरकाप उडविणारी घटना चिमूर-कान्पा राज्य महामार्गावरील शंकरपूर येथून 4 किलोमिटर अंतरावरील डोमा वळण रस्त्यावर सोमवार, 13 मे रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली.
श्रावण बापुराव गुरूनुले असे मृतकाचे नाव असून, कल्पना गुरूनुले असे जखमीचे नाव आहे. जखमीला चिमूर उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सद्या ग्रामीण भागात तेंदूपत्ता हंगाम सुरू आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पोटाची खळगी भरण्यासाठी गावातील नागरिक तेंदूपत्ता संकलनासाठी जातात. डोमा येथील श्रावण गुरूनुले गावातील अन्य सहकार्‍यांसोबत लावारी जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेले होते. परतीच्या मार्गावर असताना डोमा वळण रस्त्यावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात पतीचा जागीच मृत्यू तर पत्नीला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर तप्त उन्हात अपघातग्रस्त दुचाकीने पेट घेतला. ही दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली.
दरम्यान, चारचाकी वाहन चालकाला शंकरपूर येथील बसस्थानकावर अडविण्यात आले. वाहन जप्त करून चालकाविरूद्ध शंकरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिमूर उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास शंकरपूर पोलिस करीत आहेत.