महानगरातील पाणी पुरवठा सुरळीत करा • महानगर भाजपतर्फे मनपा प्रशासनाला निवेदन

महानगरातील पाणी पुरवठा सुरळीत करा • महानगर भाजपतर्फे मनपा प्रशासनाला निवेदन

महानगरातील पाणी पुरवठा सुरळीत करा

• महानगर भाजपतर्फे मनपा प्रशासनाला निवेदन

महानगरातील पाणी पुरवठा सुरळीत करा • महानगर भाजपतर्फे मनपा प्रशासनाला निवेदन

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर, 13 मे
महानगरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न यथाशिघ्र सोडविण्यात यावा यासाठी महानगर भाजपा पुढे सरसावली आहे, प्रभागामध्ये व विविध ठिकाणी अमृत योजना पूर्ण झाली असताना अत्यल्प प्रमाणात पाणी मिळत असून, पाणीपुरवठा नियमित होत नाही, अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ही समस्या निकाली काढण्यासाठी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष तथा माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या नेतृत्वात माजी नगरसेवकांनी मनपा प्रशासनाला निवेदन दिले. मनपा सभागृहात पाण्याच्या प्रश्‍नावर चर्चा केली.
यावेळी माजी नगरसेवक रामपाल सिंग, सविता कांबळे, शीला चव्हाण, देवानंद वाढई, राहुल घोटेकर, प्रदीप किरमे, माया उईके, शीतल गुरनुले,पुष्पा उराडे आदींची उपस्थिती होती.
ज्या ठिकाणी अमृत योजना काम पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणी सुद्धा पाणी कमी प्रमाणात येत असल्याचे वारंवार नागरिकांकडून तक्रारी येत आहे. प्रभागात व शहरात नळ योजने अंर्तगत नवीन नळ जोडणी तातडीने पूर्ण करावी. तसेच ज्या ठिकाणी पाण्याची स्थिती चिंताजनक आहे, त्या ठिकाणी तातडीने बोरिंगची व्यवस्था करण्यात यावी, टँकरची संख्या वाढविण्यात यावी आदी मागण्यासंदर्भात मनपा उपायुक्त यांच्याशी चर्चा केली. सोबतच पावसाळयापूर्वी शहरातील मोठे नाले व नाल्यांची साफ सफाई मोहीम राबविण्यात यावी, यासह अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली.