वर्धा जिल्हातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर अपघात, मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यु.

47

वर्धा जिल्हातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर अपघात, मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यु.

वर्धा जिल्हातील राष्ट्रीय महामार्गावर अपघात, मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यु.
वर्धा जिल्हातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर अपघात, मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यु.

प्रा. अक्षय पेटकर, वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि✒
वर्धा/हिंगणघाट,दि.13 जुन :- हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरील सुगुणा कंपनी जवळ आज शनिवारी दुपारच्यावेळी टैंकरला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यु झाला तर त्याचा सहपाठी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली.

टैंकर क्र एमएच-21 डब्ल्यू-6447 हा नागपुर येथून हैदराबाद जाण्यासाठी निघाला होता.या दरम्यान तालुक्यातील सेलु मुरपाड येथील वैभव नेहारे 23 तसेच मयूर विलास कुमरे 24 हे दोघे युवक पल्सर दुचाकी क्रमांक एम एच -34 क्यू-3594 ने सुगुणा फॅक्टरीकड़े निघाले होते,त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन समोर जात असलेल्या टैंकरला धडकली. सदर झालेल्या अपघातात दुचाकी चालक वैभव नेहारे 23 जागीच ठार झाला तर मागे बसून असलेला एक जण गंभीर जखमी झाला. सदर अपघात तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर वणी शिवारात घडली.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी पोहचून जखमीस उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले,येथील डॉक्टरांनी त्याचे दोन्ही पायास गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारार्थ सेवाग्राम रुग्णालयात पाठविले.

मृतक तसेच त्याचा सहपाठी हे दोघेही सुगुणा फॅक्टरीमधे नोकरीच्या शोधात दुचाकीने निघाले होते,परंतु रस्त्यातच त्यांचा असा दुर्दवी अपघात घडला. सदर घटनेचा पुढिल तपास हिंगणघाट पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक वसंत शुक्ला,पोशी सौरभ गेडाम करीत आहे.