शिवीगाळ करून त्यांना पैशाची मागणी करणा-या नगरसेवकावर कायदेशीर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा.
शिवीगाळ करून त्यांना पैशाची मागणी करणा-या नगरसेवकावर कायदेशीर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा.

शिवीगाळ करून त्यांना पैशाची मागणी करणा-या नगरसेवकावर कायदेशीर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा.

विद्युत विभाग कायम स्वरूपात काम करीत असणारे कर्मचारी राजू पवार यांना नगसेवक यांनी शिवीगाळी करून त्यांना पैशाची मागणी केलेली आहे. पैसे न दिल्यामुळे त्यांची गाडी काढून घेतली असल्यामुळे सदर नगरसेवकावर कायदेशीर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी.

अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हाध्यक्ष,मा.संजय कांबळे यांची मागणी.

शिवीगाळ करून त्यांना पैशाची मागणी करणा-या नगरसेवकावर कायदेशीर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा.
शिवीगाळ करून त्यांना पैशाची मागणी करणा-या नगरसेवकावर कायदेशीर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा.

सांगली जिल्हा प्रतिनिधि✒
सांगली:- अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ,महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हाध्यक्ष मा.संजय कांबळे यांनी आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कुपवाड शहर प्रभाग समिती क्र.3 मधील विद्युत विभाग मुकदम म्हणून काम करीत असणारे राजू पवार नामक कर्मचारी हे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असताना,वार्ड क्र.1 चे नगसेवक गजानन मगदुम यांनी सदर कर्मचारी यांना स्टेट लाईट च्या कारणावरून शिवीगाळी करून धक्काबुकी करण्याचा प्रयत्न केला.तसेच राजू पवार यांची वाहन गाडी सदर नगरसेवक यांनी काढून घेऊन, 20 हजार रूपयांची मागणी केली आहे असे कळते, सदर सर्वच विभागातील कर्मचारी कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहे.अशा गंभीर परिस्थितीत काम करीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पाटीवर शाब्बासकीची थाप देण्या ऐवजी, त्यांना आई व बहीणी वरून शिव्या खाव्या लागत आहे. त्यांची सकाळीची सुरूवातच नगसेवक यांच्या शिव्या खाऊन करावी लागत आहे. अशी परिस्थिती आहे. रोजच नागरिकांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अशा वेळी नगरसेवक आपले वर्चस्व दाखवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनातील कर्मचारी जणू आपले घरचे नोकर आहेत अशी वागणूक देत आहे. महानगरपालिकेतील विद्युत विभागात उपलब्ध झालेले विद्युत साहित्य हे कर्मचाऱ्यांना दाब दबाव टाकून, नगरसेवक आपल्या घरी नेऊन ठेवतात. तसेच आपल्या मर्जीतील लोकांनाच विद्युत सेवा पुरवली जात आहे.त्यामुळे इतर नागरिकांची गैरसोय होत आहे. असा सर्व नगरसेवकांच्या घरात असणारे महानगरपालिकेचे विद्युत साहित्य जप्त करण्यात यावे. तरी महानगरपालिकेतील आपला जीव धोक्यात घालून तारेच्या वरील कसरत करीत असणाऱ्या विद्युत कर्मचारी यांच्या होत असलेला निष्कारण अन्याय कारक वागणूकी बाबतीत विद्युत विभागीय प्रमुख अमर चव्हाण हे सदर बाबतीत लक्ष घालावयास तयार नाहीत. त्यांमुळे आपण पालक या नात्याने सत्य जाणून घेऊन सदर नगरसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व कर्मचारी यांना योग्य न्याय द्यावा.असे ईमेल द्वारे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन, अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे जिल्हाध्यक्ष यांनी केली. त्यावेळी विद्युत भागातील पिडित कर्मचारी राजू पवार यांच्या सोबत विद्युत कर्मचारी व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here