रक्तदानामुळे रक्ताच्या नविनपेशी तयार होण्यास मिळते मदत.-डॉ कीर्ती साने

24

रक्तदानामुळे रक्ताच्या नविनपेशी तयार होण्यास मिळते मदत.-डॉ कीर्ती साने

स्वेच्छा रक्तदान शिबिर, आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराचा उपक्रम.

रक्तदानामुळे रक्ताच्या नविनपेशी तयार होण्यास मिळते मदत.-डॉ कीर्ती साने
रक्तदानामुळे रक्ताच्या नविनपेशी तयार होण्यास मिळते मदत.-डॉ कीर्ती साने

सौ.हनिशा दुधे, तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
चंद्रपुर:- वयाच्या 18 वर्षानंतर कुणालाही रक्तदान करता येते. रक्तदानासारखे दुसरे कोणतेही दान नाही.रक्तदान केल्याने रक्ताच्या नवीन पेशी तयार होण्यास मदत मिळते. असे प्रतिपादन डॉ कीर्ती साने यांनी केले. त्या आ सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवारातर्फे आय.एम.ए सभागृहात शनिवार 12 जूनला आयोजित स्वेच्छा रक्तदान शिबिरात प्रमुख वक्ता म्हणून बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी ग्राम आरोग्य सेवा संस्थांचे प्रमुख अरविंद वैद्य यांची तर प्रमुख अतिथी म्हणून आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराचे संयोजक डॉ.मंगेश गुलवाडे, राजेंद्र गांधी, प्रकाश धारणे, सुभाष कासनगोट्टूवार, विशाल निबाळकर, राहुल पावडे, दत्तप्रसन्न महादानी, ब्रिजभूषण पाझारे, प्रशांत विघ्नेश्वर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

डॉ.साने म्हणाल्या,शुभमने वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदानाचा संकल्प केला.असा संकल्प युवकांनी घेतला पाहिजे.दिलेले रक्त पूर्ण पणे 21 दिवसांत तयार होते. 90 दिवसानंतर रक्तदान पुन्हा करता येते.रक्तदानाची संधी सोडू नका असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी अरविंद वैद्य, श्रीपाद गोसाई, मनोज गुजराथी, शुभम लिंगेवार, शीतल तोकलवार यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे शुभमने रक्तदान करून वाढदिवस साजरा केला. यावेळी केक कापण्यात येऊन सर्वांनी शुभेच्छा दिल्या.सर्व रक्तदात्यांचा रक्तगट “ओ” पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय चमूने आश्चर्य व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले. मयूर चहारे यांनी आभार मानले. यावेळी रामकुमार आकापेलिवार, शुभम शेंगमवार व सतीश तायडे यांची उपस्थिती होती.