डॉ. कुलकर्णी हॉस्पीटल तुकूम समोरील रोडवर होणाऱ्या वाहतुक कोंडीतून लवकर नागरिकांची सुटका करा: कुणाल ठेंगरे

सौ.हनिशा दुधे, तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
चंद्रपुर;- सदर प्रभाग क्र.1 येथील तूकुम येथे डॉ. कुलकर्णी यांच्या हॉस्पीटल (ओपीडी) मध्ये येणाऱ्या पेशंटची वाहने पार्क करण्यासाठी जागा नसल्याने तीथे येणारी रुग्णांची संख्या व रुग्णांना भेट देण्यासाठी येणारी त्यांचे नातेवाईक व हॉस्पीटल मध्ये काम करणारा स्टॉप यांची वाहने हे रोडवर लावून आम नागरीकांना त्याचा अतोनात त्रास होत आहे. ये जा करणाऱ्या नागरीकांना व वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या परिस्थीतीच गांभीर्या लक्षात घेता यापासून होणाऱ्या त्रासापासून नागरीकांची सुटका करण्या करिता आज मा.आयुक्त साहेब ,म.न.पा.चंद्रपूर व वाहतुक निरीक्षक साहेब, चंद्रपूर यांना या बाबत चे तक्रार निवेदनाच्या स्वरूपात सादर केले. यावेळेस वाहतूक निरीक्षक साहेबांनी तात्काळ निवेदनाची दखल घेऊन संबंधित हॉस्पिटल वर कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळेस माझ्यासह शहर महासचिव सचिव कार्तिक निकोडे, शहर सचिव हिमांशू , चिराग ठेंगरे उपस्थित होते.