पंचायत समिती ब्रह्मपुरी, पंचायत स्तर अंतर्गत, माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कामांचे भूमीपुजन.

अमोल माकोडे, ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी✒

ब्रम्हपुरी:- पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत 15 वा वित्त आयोग पंचायत समिती स्तर अंतर्गत ब्रह्मपुरी तालुक्यात विविध ठिकाणी कामे मंजूर झालेले असून याबाबत माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांचे मार्गदर्शनाखाली या कामांची निवड करण्यात आली. या कामांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम त्यांचेच हस्ते संपन्न होणार होता, परंतु प्रासंगिक कारणांमुळे ते राहू न शकल्यामुळे या कामांचे भूमिपूजन प्रा. रामलाल महादेव दोनाडकर, सभापती पंचायत समिती ब्रह्मपुरी, सौ. सुनीताताई ठवकर, उपसभापती पंचायत समिती ब्रह्मपुरी, अॅड.सौ. दीपाली मेश्राम, जिल्हा परिषद सदस्या चंद्रपुर, सौ. उर्मिलाताई धोटे सदस्या पंचायत समिती ब्रम्हपूरी, प्रकाशभाऊ नन्नावरे सदस्य पंचायत समिती ब्रम्हपूरी, सौ. ममताताई कुंभारे सदस्या पंचायत समिती ब्रम्हपूरी, सौ सुनंदाताई ढोरे सदस्या पंचायत समिती ब्रम्हपूरी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी रविभाऊ मेश्राम माजी सभापती पं. स. ब्रह्मपुरी, अनिल तिजारे सरपंच तलोधी ज्ञानेश्वरजी दिवटे भाजपा युवा नेते तथा ठेकेदार बल्लारपूर. धीरज पाल भाजपा सोशल मीडिया प्रमुख ब्रह्मपुरी, दिवारू कुंभारे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

मौजा-बोरगाव येथे सौ. उर्मिलाताई धोटे यांनी सुचवलेल्या काम-सौर उर्जेवर आधारित दुहेरी वाटर पंपाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच सौ मेघा कवडुजी पिंपळकर, रुपेशजी मैंद उपसरपंच बोरगाव. धनु गौतम तोंडरे सदस्य, सौ वैशाली महेश ठाकरे सदस्या, सौ.अर्चना विजय दोनाडकर सदस्या तसेच भाजपा ज्येष्ठ नेते प्रभाकरजी भागडकर, मन्सारामजी तोंडरे, ईश्वरजी मैंद, अंबादासजी दुपारे माधवजी प्रधान इ.प्रामुख्याने उपस्थित होते.

मौजा भगवानपुर येथे श्री प्रकाशजी नन्नावरे सदस्य पंचायत समिती ब्रम्हपूरी यांनी सुचवलेली काम- सौर उर्जेवर आधारित दुहेरी वॉटर पंपाचे भूमिपूजन करण्यात आले .यावेळी सौ. मनीषा मडावी सरपंच, सुधाकरजी कांबळी उपसरपंच, राजेश्वरजी ठाकरे सदस्य, राजूजी प्रधान सदस्य, सौ. अर्चना मरस्‍कोल्हेे सदस्या, प्रल्हादजी चौधरी, ईश्वरजी नन्नावरे, नामदेवजी शेंडे व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते.

पंचायत समिती ब्रह्मपुरी, पंचायत स्तर अंतर्गत, माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कामांचे भूमीपुजन.

मौजा- चोरटी येथे श्री.प्रकाशजी नन्नावरे पंचायत समिती सदस्य ब्रह्मपुरी यांनी सुचवलेली काम हायमास्ट लाईटचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. मनीषा मडावी, उपसरपंच सुधाकर कामडी, राजेश्वरजी ठाकरे, राजूजी प्रधान, सौ. अर्चना मरस्कोल्हे, प्रल्हाद चौधरी, दिलीप राऊत, विश्वनाथ ढोरे, देविदास प्रधान इत्यादी उपस्थित होते.

मौजा-वायगाव येथे प्रकाश नन्नावरे यांनी सुचवलेले काम हाय मास्ट लाईटचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी सरपंच गुरुदेवजी तुपट, उपसरपंच चक्रधर ढोक, ग्रा.पं. सदस्य सुधाकर नन्नावरे, सदानंद शेंडे, सौ. कौशल्याताई बुल्ले, सौ. भारती निकोडे इत्यादी उपस्थित होते.

मौजा गांगलवाडी येथे सौ. सुनीताताई ठवकर उपसभापती पं.स.ब्रम्हपूरी यांनी सुचवलेले काम जिल्हा परिषद शाळेला स्वच्छतागृहांचे बांधकाम करणे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी सरपंच धनंजयजी बावणे, ग्रा.पं.सदस्य, विवेक बनकर, सौ. सुमती खरकाटे सदस्या, सौ हिरकन्या कोसे सदस्या, बरकत अली शेख हे प्रामुख्याने उपस्थित होते.

मौजा- डोरली येथेे प्रा. रामलाल महादेव दोनाडकर सभापती, पंचायत समिती, ब्रह्मपुरी यांनी सुचवलेले काम हाय मास्ट लाईटचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. वनश्री शेंडे, उपसरपंच ठाकरे, ग्रा.पं.सदस्य संजय तलांडे, जगदीश अलोने, सौ.गीता विलास राऊत सौ.आखाडे ग्रामसेविका, संजय ऊरकूडे रोजगार सेवक, देविदास राऊत ग्रा.पं. कर्मचारी सुरेशजी राऊत, भाग्यवान ठाकरे, केवळरामजी ठाकरे, भगवानजी घुटके, नवनाथ भेंडारे, विश्वनाथजी राऊत, मधुकरजी दोनाडकर, सागर लिंगायत, नामदेवजी पत्रे, हरीजी घुटके श्री. मारुती दोनाडकर, ठाकरे, मनोहरजी ठाकरे, रामभाऊ राऊत, पप्पू राऊत, धनराज बुल्ले आणि बहुसंख्य डोरलीवासीय जनता उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here