पोंभुर्णा ग्रामीण रूग्‍णालयाचे काम 30 दिवसात पूर्ण करा; शासकीय अधिका-यांना ऑनलाईन बैठकीत निर्देश.

55

पोंभुर्णा ग्रामीण रूग्‍णालयाचे काम 30 दिवसात पूर्ण करा; शासकीय अधिका-यांना ऑनलाईन बैठकीत निर्देश.

पोंभुर्णा ग्रामीण रूग्‍णालयाचे काम 30 दिवसात पूर्ण करा; शासकीय अधिका-यांना ऑनलाईन बैठकीत निर्देश.
पोंभुर्णा ग्रामीण रूग्‍णालयाचे काम 30 दिवसात पूर्ण करा; शासकीय अधिका-यांना ऑनलाईन बैठकीत निर्देश.

सौ.हनिशा दुधे, तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
चंद्रपूर:- जिल्‍हयातील पोंभुर्णा येथे 30 खाटांच्‍या नविन ग्रामीण रूग्‍णालयास काही वर्षापूर्वी मान्‍यता मिळाल्‍यानंतर हे रूग्‍णालय नागरिकांच्‍या सेवेत रूजु करण्‍यासाठी आवश्‍यक त्‍या सर्व बाबींची पूर्तता येत्‍या 30 दिवसात पूर्ण करण्‍याचे निर्देश संबंधित अधिका-यांना गुरूवार 10 जून ला झालेल्‍या ऑनलाईन बैठकीद्वारे दिल्‍याने हे रूग्‍णालय आता लवकरच नागरिकांच्‍या सेवेत सर्व सोयींनी रूजु होणार आहे.

या बैठकीत जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक डॉ. निवृत्‍ती राठोड, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. भास्‍करवार, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, पोंभुर्णा पंचायत समितीच्‍या सभापती अलका आत्राम, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहूल संतोषवार, पंचायत समिती उपसभापती ज्‍योती बुरांडे, पंचायत समिती सदस्‍य विनोद देशमुख, भाजपा नेते गंगाधर मडावी, श्‍वेता वनकर, शारदा कोडापे, ईश्‍वर नैताम, विजय कस्‍तुरे, मोहन चलाख, सुनिता मॅकलवार, पुष्‍पा बुरांडे, नेहा बघेल यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरीही कोरोनाचा धोका टळलेला नाही. तिसरी लाट येण्‍याची शक्‍यता वर्तविली जात असताना ही लाट चिमुकल्‍यांना आपल्‍या कवेत घेणार आहे. त्‍यामुळे तातडीने पोंभुर्णा येथील नवनिर्मीत ग्रामीण रूग्‍णालय कार्यान्‍वीत करणे गरजेचे आहे. यावर बोलताना जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक डॉ. राठोड यांनी सदर रूग्‍णालयात पदभरती करण्‍यासंदर्भात कारवाई सुरू असल्‍याचे सांगीतले. ग्रामीण रूग्‍णालय पोंभुर्णा येथील वैद्यकिय अधिक्षक यांना संवितरण अधिकारी घोषीत करण्‍यात आले आहे. या रूग्‍णालयात आरोग्‍य सुविधा पुरविण्‍याकरिता 97.43 लक्ष रू. चे अंदाजपत्रक सादर करण्‍यात आले असून यातुन साहित्‍य सामुग्री, यंत्र सामुग्री, वैद्यकिय उपकरणे पुरवठा करण्‍याबाबतचा प्रस्‍ताव सादर करण्‍यात आल्‍याचे ते म्‍हणाले. याचवेळी डॉ. राठोड यांनी ग्रामीण रूग्‍णालयाच्‍या सेवेतील 15 काल्‍पनीक पदभरतीची जाहीरात 4 जूनला प्रकाशित केल्‍याचे सांगीतले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. भास्‍करवार यांनी आरोग्‍य संस्‍थेची बांधकामे पूर्ण झाल्‍यावर ताबा पावती घेताना घ्‍यावयाच्‍या नाहरकत प्रमाणपत्राबाबत माहिती दिली.

यावर अधिक-यांसाठी आवश्‍यक असलेल्‍या निवासस्‍थानांचे बांधकाम व इतर सर्व कामे 30 दिवसांच्‍या आत पूर्ण करून HB सदरहू 30 खाटांचे नवनिर्मीत ग्रामीण रूग्‍णालय नागरिकांच्‍या सेवेत रूजु करा, असे निर्देश दिल्‍याने ग्रामीण भागातील जनतेची आरोग्‍य सेवेसाठीची प्रतिक्षा आता संपणार आहे.