फर्दापुर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी शेतकरी विकास पॅनलच्या ताब्यात. रमाबाई लोखंडे कडून विरोधक चारीमुंड्या चित; 202 मते घेऊन दणदणीत मिळवला विजय

फर्दापुर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी शेतकरी विकास पॅनलच्या ताब्यात.

रमाबाई लोखंडे कडून विरोधक चारीमुंड्या चित; 202 मते घेऊन दणदणीत मिळवला विजय

फर्दापुर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी शेतकरी विकास पॅनलच्या ताब्यात. रमाबाई लोखंडे कडून विरोधक चारीमुंड्या चित; 202 मते घेऊन दणदणीत मिळवला विजय

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर:9860020016

सिल्लोड : – सोयगाव तालुक्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी च्या पायथ्याशी असलेल्या फर्दापुर गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. या सोसायटीच्या निवडणूकीत सर्वच उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून अतितटीच्या लढाईत शेतकरी विकास पँनलने विरोधकांना चारीमुंड्या चित करत रमाबाईं शेनफडू लोखंडे यांचा दणदणीत विजय झाला.या सोसायटी च्या निवडणूकीत १२ उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले होते फक्त एका जागेसाठी ही निवडणूक होती माजी पंचायत समिती सदस्य विजय तायडे विरुध्द कामराज तायडे अशीच ही निवडणूक होती परंतु विजय तायडे यांच्याच बाजूने सर्व मतदार असल्यामुळे ही निवडणूक एकतर्फाच झाली त्या निवडणूकीत रमाबाईं लोखंडे ह्या २०२ मते घेऊन विजयी झाल्या. रमाबाई लोखंडे यांचा विजय होताच विरोधक याचे चांगलेच तोंडचे पाणी पळाले हे प्रत्यक्ष पाहायला मिळाले.
या निवडणूकीत
८ सर्वसाधारण,१ इ.मा. व.,१ विजा/भज/विमा.प्र, २.महिला राखीव. हे १२ उमेदवार बिनविरोध निवडून आले. मात्र एका जागेसाठी झालेल्या या निवडणूकीत २ उमेदवार उभे होते. रमाबाई शेनफडू लोखंडे, विरुध्द कामराज तायडे, अशी यांच्यात सरळ लढत झाली. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या एकमेव जागेसाठी कामराज तायडे याच्या हट्टपणामुळे व या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या जागेसाठी दिनांक:-८/०६/२०२२ वार बुधवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फर्दापुर येथे सकाळी :-८ ते सायंकाळी :-४:०० वाजेपर्यंत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला एकूण मतदान ६१५ पैकी फक्त :३०१ असे एकूण मतदान झाले.दुपारी :-४:०० वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.त्यावेळी निवडणूक अधिकारी गाजुलवाड,दिलीप रावने,निवडणूक अधिकारी, चव्हाण कर्तार,निवडणूक अधिकारी, गटसचिव फर्दापुर अशोक वाघ, गटसचिव, फर्दापुर, अशोक ओंकार पाटील, कृष्णा गव्हांडे, शिपाई, यांनी मतमोजणी केली.फर्दापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डी.बी. वाघमोडे, उपनिरीक्षक रंजित कासले,पोलीस कर्मचारी,शिवदास गोपाळ, तडवी,चाथे मॅडम,यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रमाबाई शेनफडू लोखंडे यांनी २०२ मतांची जोरदार मुसंडी घेत विजयी झाल्या कामराज तायडे याला अवघ्या ९९ मतावर समाधान मानत त्याला धूळ चारली.या निवडणूकीत २१ मते ही अवैध झाली जर कामराज तायडे यांनी हा हट्ट धरला नसता तर ही निवडणूक पार पाडावी लागली नसती त्याना माहित असुन सुद्धा फक्त विजय तायडे यांना विरोध म्हणून त्यांनी ही एका जागेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती पण शेवटी हार मानावी लागली. शेतकरी राजा एकता विकास पॅनलच्या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील एकमेव महिला उमेदवार रमाबाई शेनफड लोखंडे या यांना निवडून आणण्यासाठी व एकमेव जागेसाठी गावातील सर्व राजकीय पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी यांनी एक दिलाने एक मताने निवडून आणण्यासाठी सर्व राजकिय मतभेद बाजूला ठेवून माजी पंचायत समिती सदस्य, विजय तायडे यांच्या शब्दाला मान देऊन व हाकेला हात देऊन सर्वांनी खांद्याला खांदा लावून एक जागेसाठी फर्दापुर, ठाणा, वरखेडी, धनवट, वरखेडी तांडा, जंगला तांडा, फर्दापुर तांडा वस्ती येथे सर्वांनी मिळून शेतकऱ्यांना आवाहन करून “शेतकरी राजा एकता विकास पॅनल” च्या महिला उमेदवार रमाबाई शेनफडू लोखंडे यांची निशाणी छत्री समोरचे बटन दाबून आपले अमूल्य मत वाया न जाता त्यांना सहकारी संस्थांमध्ये जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या असे आवाहन करण्यात आले.व “शेतकरी राजा एकता विकास पॅनलची” एक हाती सत्ता खेचून आणली.व रमाबाई शेनफडू लोखंडे यांना निवडून आणण्याचे खरे श्रेय जर जात असेल व सिंहाचा वाटा जर असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे,पदाधिकारी माजी चेअरमन जगन्नाथ गव्हांडे,व माजी सरपंच अजीजखा हमीदखा पठाण, यांचा सिहांचा वाटा आहे हे नाकारता येणार नाही कारण या एक जागेसाठी त्यांची जिद्द होती कारण सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन निवडून आणण्यासाठी धुरा सांभाळली सर्व गाव एकीकडे कामराज तायडे हा गावातील प्रतिष्ठित नागरिक यांचे सुद्धा ऐकायला तयार नव्हता त्यामुळे १२ संचालक उमेदवार हे सर्व बिनविरोध निवडून आलेले होते. मात्र कामराज तायडे याने माघार न घेतल्यामुळे सर्वांना एकत्र येऊन अनुसूचित जाती जमाती या एकमेव जागेला निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोयगाव तालुका अध्यक्ष, इंद्रजित साळुंके, गफूरखा मगबुलखा, शे.निसार शे. महंमद नूर अण्णा तांगडे, भागवत भोंबे, समाधान बावस्कर, रवींद्र बावस्कर, संतोष शिंदे, शेख रफीक हुसेन, मनोहर साबळे, गजानन शिरसाठ, विलास वराडे ,पिंटू आगळे, उस्मान खान पठाण, मजीत पठाण ,राहुल दामोदर, संतोष वेल्हाळ, काशिनाथ लंबे, भगवान वाघ, ज्ञानेश्वर साबळे, बळीराम जाधव,राजेंद्र तायडे, आदिंनी रमाबाई लोखंडे यांचा निकाल विजयी निकाल घोषित होताच गुलाल, पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.माजी पंचायत समिती सदस्य विजय तायडे ,यांनी गावातील सर्व लोकप्रतिनिधी यांनी निवडणुकीमध्ये मतं मिळवण्यासाठी जी मेहनत केली त्या सर्वांचे आभार मानले व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा सर्व मतभेद बाजूला ठेवून आपण खांद्याला खांदा लावून काम करू या व पंचायत समितीच्या उमेदवार किंवा जिल्हा परिषद उमेदवार हा फर्दापुर मधून देऊया एकजुटीने काम करूया असे मनोगत व्यक्त केले व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, तथा माजी चेअरमन जगन्नाथ गवंडे यांनी मतदारांचे आभार व्यक्त केले .