पन्हळे गावात “विधवा प्रथा बंद” जनजागृती करण्यासाठी तरुण युवकांनी घेतला पुढाकार

पन्हळे गावात “विधवा प्रथा बंद” जनजागृती करण्यासाठी तरुण युवकांनी घेतला पुढाकार

पन्हळे गावात "विधवा प्रथा बंद" जनजागृती करण्यासाठी तरुण युवकांनी घेतला पुढाकार

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो.नं. ९८६९८६०५३०

राजापूर : – महाराष्ट्र राज्य सरकारने विधवा प्रथा बंद करण्याचा आदेश दिलेला आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुक्यातील पन्हळे गावात प्रथमच विधवा प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार उमेश शिवगण यांचा प्रयत्नाने परिवर्तनासाठी जनजागृती तसेच पन्हळे गावातील तरुण युवकांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गावातील महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय लोकसत्ताक संघटनेचे अध्यक्ष मा.अमोलकुमार बोधिराज, उपाध्यक्षा मा. दीपिका आग्रे, भारतीय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मा. मनीष जाधव, सहकोषाध्यक्ष पिलाजी कांबळे, बेरोजगार महासंघाचे उपाध्यक्ष संदीप आग्रे इत्यादी मान्यवर होते.

समाजातील अशा अनिष्ट प्रथा बंद व्हाव्यात. व्यक्तिस्वातंत्र्याचा वापर सर्वांनी करावा आणि आयुष्य सुखाने जगावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांचे आपल्यावर अनेक उपकार असल्याचे सांगितले.
एका विधवेने कुंकू लावून समाजातील इतर विधवा महिलांना प्रोत्साहन दिले. यापुढे पती गेल्यावर कोणीही विधवेचे अलंकार उतरवणार नाही यासाठी ग्रामस्थांनी एक मताने निर्णय घेतला. पन्हळे गावातील तरुण मुलांनी यात हिरीरीने भाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उमेश शिवगण यांनी केले.