तुम्ही मुंब्राचे वाटोळे करायला सुरवात केली आहे….जितेंद्र आव्हाड हे कुणाला म्हणाले? नक्की वाचा

60

तुम्ही मुंब्राचे वाटोळे करायला सुरवात केली आहे….जितेंद्र आव्हाड हे कुणाला म्हणाले? नक्की वाचा

मीडियावार्ता
दि:१३, जून: मा. आयुक्त, ठाणे महानगरपालिका एक आमदार लोकप्रतिनिधी या नात्याने आपणांस हे कळविताना अत्यंत दु:ख होत आहे कि, मुंब्रा परिसराचे आपण वाटोळे करायला घेतले आहे असे दिसते. पोलीस आयुक्त असो नाहीतर महापालिका आयुक्त असो आपण मुंब्रा पूर्णपणे ड्रग्जच्या जाळ्यात अडकवत चालले आहात. गेली 14 वर्षे जे आम्ही दाबून ठेवलं होत. पोलीस अधिकारी देखिल आम्हांला सहकार्य करायचे. ड्रग्जचा व्यवहार जवळ-जवळ बंद करण्यात आला होता. आता ड्रग्जमधून देखिल हफ्ते घ्यायला सुरुवात झाली आहे.

अनधिकृत बांधकाम लक्की कंपाऊंड दुर्घटनेनंतर जवळ-जवळ बंद झालं होते. आपल्या काही अधिका-यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेपोटी आता एकेका गल्लीत 20-20 बांधकामे सुरु आहेत. मुंब्रा जेव्हा मी हातात घेतलं तेव्हा पाण्याचा त्रास होता, विजेचा त्रास होता, रस्त्यांचा त्रास होता. या तिन्ही गोष्टींवर मात करुन मुंब्रा शहर हे नावारुपाला आणलं. सध्या इतक्या अनधिकृत इमारती उभारल्या जात आहेत तसेच त्या आपल्या निदर्शनास देखील आणून दिल्या जात आहेत. परंतु आपण त्यावर कुठलिही कारवाई करतांना दिसत नाहीत. हे खरं आहे कि, मी विरोधी पक्षातील आमदार आहे. हे देखिल खरं आहे कि, मी सरकारवर टिका करतो. म्हणून या शहराचे आपण वाटोळे करणार का ? शहराची आजची परिस्थिती बघता गल्ली बोळांमध्ये ड्रग्ज विकले जात आहेत. गल्ली बोळांमध्ये अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. साईटवर रिव्हॉल्वहर काढली जात आहे. मारामारीच्या घटना घडत आहेत.आता मी हे लिहीतोय याबद्दल पोलीसांनाही राग येणार आणि महापालिका कर्मचा-यांनाही राग येणार. पण, शेवटी हे शहर जस होत तस आता राहिलेले नाही हे शहर बदललं आहे. इतक्या जर अनधिकृत इमारती उभारल्या जात असतील तर पाणी टंचाई उद्भवणार. ती कशी हाताळायची. रस्ते खोदले जातात ते कसे सांभाळायचे. ड्रेनेजचा प्रॉब्लेम येतो, रस्त्यावर घाण पसरलेली असते, कचरा पसरलेला असतो त्याच्याकडे कोणिही लक्ष देत नाही.

https://mediavartanews.com/2023/06/12/savitribai-phule-information-2/

एकेकाळी पूर्णपणे भकास झालेला मुंब्रा नावारुपाला आलं. एक काळ होता कि, 1500 ते 1700 रुपये स्क्वेअर फूट या भावाने घरे विकली जायची. आज 6000 रुपये स्क्वेअर फूट भावाने घरे विकली जातात. हा बदल इथे पायाभूत सुविधा आल्यामुळेच झाला. जोपर्यंत प्रशासन आणि मी हातात हात घालून शहरावर कंट्रोल करीत होतो, त्यावेळेस कोणिही हिम्मत करीत नव्हतं ड्रग्ज विकायची, अनधिकृत इमारती उभारायच्या. आता हे कोणामुळे होतयं हे माहित नाही. पण, प्रशासन माझ्यापासून 10 फूट लांब झालेलं आहे. यामध्ये नुकसान माझं नाही, नुकसान मुंब्र्याच आहे. उघड्या डोळ्याने मुंब्र्यातील सुज्ञ नागरीक बघत आहेत कि, हे जितेंद्र आव्हाड यांच्यावर अन्याय पण, करीत आहेत. त्यांच्यावर खोटे गुन्हे टाकून त्यांना जेलचा रस्ता पण, दाखवत आहेत आणि इथे सगळं आपल्या ताब्यात घेत आहेत. हा ताब्यात घेणारा कोण आहे हे पण, जनतेला माहित आहे.

पण तुम्ही दोघे जबाबदार आहात हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कि, एक शहर आपण राजकारणापोटी बर्बाद करीत आहोत. या शहराचे भविष्य बर्बाद करीत आहोत. कोणितरी तुम्हांला विचारणारा असेलच आज नाहीतर उद्या.

                                                               – डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटर वॉलवरून

https://mediavartanews.com/2023/06/11/freedom-fighter-ramprasad-bismil-2/