आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आधी कुस्तीपटुंना न्याय मिळावा…

73

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आधी कुस्तीपटुंना न्याय मिळावा…

रमेश कृष्णराव लांजेवार
मो.नं.9921690779

दिनांक 23 एप्रिल 2023 पासून कुस्तीपटुं आंदोलन करीत होते.परंतु सरकारच्या आश्वासना नंतर  कुस्तीपटूंनी एक पाऊल मागे हटुन तात्पुरते आंदोलन मागे घेतले.कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली 15 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतले.यानंतर कुस्तीपटुंना न्याय मिळण्याच्या आशा उंचावल्या आहेत.त्यामुळे देर आऐ दुरूस्त आऐ कुस्तीपटुंना न्याय अवश्य मिळेल याची मला खात्री आहे.परंतु कुस्तीपटूंना शंका आहे की 15 जूनला न्याय मिळेलच याची खात्री नाही.त्यामुळे 15 जूनला जर योग्य न्याय मिळाला नाही तर 17 जूनला पुन्हा नव्याने आंदोलनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यात येईल असे कुस्तीपटूं बजरंग पुनियान सांगितले आहे.

साक्षी मलिक म्हणतात की आम्ही आशियाई खेळांमध्ये तेव्हाच सहभागी होऊ जेव्हा सर्वच समस्या दूर होऊन आमच्या मागण्या मान्य होईल.म्हणजेच 15 जूनला तोडगा निघेलच यांची कुस्तीपटूं हमी (गॅरंटी) नाही.कारण दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूंना लैंगिक शोषणासंबंधी व्हिडीओ व ऑडिओ देण्याची नोटीस बजावली आहे.अशा प्रकारे छळाचे पुरावे मागविले आहेत ही आश्चर्यजनक व गंभीर बाब आहे.त्यामुळे याप्रकरणात सरकारचे वेळकाढू धोरणं तर नाही ना असाही प्रश्न उपस्थित होत आहे.कारण कोणताही खेळाडू असो तो देशाची “आन-बाण-शान”आहे. कारण दिनांक 23 सप्टेंबर ते 8 आक्टोंबर पर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धा चीनच्या हांगझाऊमध्ये होणार आहे.याकरीता भारतीय टीमची निवड (सिलेक्शन) 30 जूनच्या आधीच होणार आहे.त्यामुळे कुस्तीपटुंच्या आंदोलनातील कोणत्याही खेळाडूंवर कोणतीही आच येणार नाही याची काळजी सरकारने व क्रीडा मंत्रालयाने घ्यावी व त्यांच्यावर आंदोलना दरम्यान असलेले संपूर्ण गुन्हे मागे घ्यावे आणि त्यांचा आशियाई स्पर्धा खेळण्याचा मार्ग मोकळा करावा. 

https://mediavartanews.com/2023/06/13/jitendra-awhad-about-mumbra-city/

त्याचप्रमाणे सरकारने हेही लक्षात ठेवले पाहिजे की आंदोलनाचा आशियाई खेळांवर कोणताही परिणाम होवू नये याकरिता 15 जूनपर्यंत बृजभूषण शरण सिंह यांच्या आरोपांबद्दल अंतिम निर्णय घ्यावा.कारण कोणीही आरोप जेव्हा करतो तेव्हा त्यात अर्धसत्य अवश्य असते.परंतू आता बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची लिस्ट वाढण्याची शक्यता दिसत आहे.कारण सात कुस्तीपटुंच्या आरोपानंतर रेफरी जगबीर सिंह यांनी आरोप लावले आहेत.यानंतर फिजियोथेरेपिस्ट परमजीत मलिक यांनीही बृजभूषणवर आरोप केला आहे की कुस्तीपटुंचे आरोप 100 टक्के खरे आहेत.कुस्तीपटुंना वारंवार त्रास देने, शारीरिक शोषण सुध्दा होत होते. अनेक वर्षांपासून कुस्तीपटुंशी जुळलेल्या परमजीत मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे बृजभूषण शरण सिंह यांची मुश्किले आणखी गडद होवू शकते.

परमजीत मलिकने म्हटले आहे की 100 कुस्तीपटुंचा मानसिक आणि शारीरिक शोषण झाले आहे.या घटना अनेक दिवसांपासून सुरू आहेत.या परमजीत मलिक यांच्या गंभीर आरोपांमुळे बृजभूषण शरण सिंह यांची मुश्किले पुन्हा वाढली आहे. ब्रृजभुषणवर लावलेले आरोप खरे की खोटे याची 15 जूनला गांभीर्याने चौकशी व्हायलाच हवी. कारण कोणी जेव्हा आरोप करतो तेव्हा त्यात अर्धसत्य अवश्य असतें व कारवाई नंतर सत्य सामोरं येते.त्यामुळे ब्रिजभुषण शरण सिंह यांच्यावर असलेले आरोप अत्यंत गंभीर,घृणास्पद आणि निंदनीय आहे. त्यामुळे त्यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावर रहाण्याचा तिळमात्र अधिकार सुध्दा नाही. सरकारने लक्षात ठेवले पाहिजे की देशाचा प्रत्येक खेळाडू देशाची पुंजी आहे. त्यामुळे ब्रृजभूषण सारखे अनेक अध्यक्ष येतील आणि जातील. परंतु खेळाडू तयार करायला अनेक वर्षे लागतात.खेळाडुंना न्याय मिळत नसल्याने त्यांनी मेडल सरकारला परत करण्याची घोषणा केली होती.

https://mediavartanews.com/2023/06/10/eye-donation-information/

यावर बऋजभूषण शरण सिंह म्हणाले होते की सरकारने दिलेले पैसे परत करावे.त्यावर बॉक्सर विजेंदर सिंगने प्रत्युत्तर दिले अमेरिकेतील बॉक्सरने आपलं पदक नदीत बुडविल होत.यामागचे कारण म्हणजे वर्णभेदावरून झालेला अपमान सहन न झाल्याने त्याने ही कृती केली आणि अमेरिकेत क्रांती झाली होती.त्यामुळे सरकारने 15 जूनला योग्य निर्णय घेवून कुस्तीपटुंना न्याय द्यावा.कारण खेळाडूंना तयार होण्याकरिता अगोदर तालुका स्तरावर खेळावे लागते,नंतर जिल्हा स्तरावर, नंतर राज्य स्तरावर यात अव्वल खेळावे लागते तेव्हा देशात अव्वल नंबर लागतो.यातुनच आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये नियुक्ती होते.म्हणजे संपूर्ण चक्रव्यूह पार केल्यानंतरच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळता येते.

त्यामुळे प्रत्येक खेळाडू हा आपल्या मेहनतीने व कर्तुत्वाने तयार होतो. कुस्तीगिर खेळाडूंचे आंदोलन पहाता आजी-माजी खेळाडूंनी आंदोलक कुस्तीगीरांना खुले समर्थन द्यायला हवे.कारण प्रत्येक क्षेत्रातील खेळाडू हा देशासाठी खेळत असतो.त्यामुळे देशाचे सर्वच खेळाडू देशाची आन-बान-शान आहे.कुस्तीपटुं खेळाडूंना आशियाई स्पर्धेच्या आधी योग्य न्याय मिळेल हीच अपेक्षा.जय हिंद!