बहुजन मुक्ति पार्टी तर्फे प्रतिनिधित्व बचाओ, लोकतंत्र बचाओ आंदोलन.

✒आशिष अंबादे✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
हिंगणघाट,दि.13 जुलै:- बहुजन मुक्ति पार्टी आणि आर एम बी के एस तर्फे बहुजनांच्या संविधानिक हक्क अधिकार विरोधातील महाराष्ट्र शासनाच्या धोरणांच्या आणि शासन निर्णयाच्या विरोधात प्रतिनिधित्व (आरक्षण) बचाओ, लोकतंत्र बचाओ तालुकास्तरीय धरणा प्रदर्शन आणि घंटानाद आंदोलन हिंगणघाट तहसील समोर करण्यात आले. हे आंदोलन महाराष्ट्रातील 358 तहसील कार्यालया समोर आज सोमवार दि. 12 जुलै 2021 रोजी आयोजित करण्यात आले होते.
1) महाराष्ट्र सरकारने 7 मे 2021 च्या शासन निर्णयाने पदोन्नतीतील आरक्षण नाकारल्याच्या विरोधात.
2) भारत सरकारने शेतकरी विरोधी केलेल्या कायद्याच्या विरोधात.
3) भारत सरकारने शेतकरी ,शेतमजूर, कामगार यांच्या हिताचे कामगार कायदे रद्द केल्याच्या विरोधात.
4) भारत सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या धोरणाने संपूर्ण शिक्षण खाजगीकरण केल्याच्या विरोधात.
5) कर्मचारी यांची पेंशन बंद केल्याच्या विरोधात.
6) बहुजनांचे संविधानिक प्रतिनिधित्व ( आरक्षण) व हक्क अधिकार विरोधातील धोरणाच्या आणि शासन निर्णयाच्या विरोधात
आंदोलन करून तहसीलदार साहेब हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये सहभागी संघटनाचे कार्यकर्ते बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष गेमदेव मस्के, उपाध्यक्ष संजय ढोकपांडे,राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गजानन माऊसकर,महिला आघाडीच्या हिंगणघाट तालुका अध्यक्षा प्रियाताई येनोरकर, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्कचे संजय डोंगरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा कुंदाताई गोडघाटे, मयुरी पाटील, नीलिमा वर्हाडे, गजानन वर्हाडे, अर्चना सुटे,इंडियन लाॅयर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष एड.संदीप कांबळे, ऍड. प्रगणेश कांबळे, ऍड. शंभरकर, सिद्धार्थ वावरे, महेंद्र वावरे, सुरज ताकसांडे, राष्ट्रीय सिकलिगर सिख मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष साधुसिंग भादा, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे दशरथ मडावी, हनुमान हुलके, विनायक सलामे, विठ्ठल उरकुडे, मुकेश बावणे, गिरधर जाधव, गजानन कोराम, अनिल कुमरे, किशोर कोल्हे, नारायण ढोकपांडे, उत्तम कारमोरे, विशाल नवघरे, नारायण कलोडे, प्रशांत येनोरकर, मोरेश्वर झोडे, प्रज्योत लिहितकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.