सांगली साद कोविड रुग्णालयाचा हलगर्जी पणा, महापालीकेने ठोकला 25 हजारांचा दंड.

✒संजय कांबळे✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
9890093862
सांगली,दि.12 जुलै:- सांगली येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. सांगली महानगरपालिकेच्या समडोळी रोडवरील कचरा डेपोत रिक्षा घंटागाडीमध्ये साद कोविड रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्ट वस्तु मिळाल्यामुळे साद कोविड रुग्णालयाला 25 हजार रुपयाच्या दंड ठोठावण्यात आला.
सांगली येथील साद कोविड रुग्णालयात मोठ्या प्रमाणात हलगर्जी कारभार समोर आला आहे. त्याकारणामुळे सांगली महानगर पालिका तर्फे रुग्णालयावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. प्रभाग क्र. 15 मधील घंटागाडीत जैववैद्यकीय कचरा आढळून आल्यानंतर त्याची पडताळणी केली असता तो कचरा सांगलीतील साद कोविड हॉस्पिटलचा असल्याचे निदर्शनास आले. यानंतर आयुक्त कापडणीस यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे व पर्यावरण अभियंता किल्लेदार यांनी रुग्णालयावर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत स्वच्छता निरीक्षक अंजली कुदळे, किशोर कांबळे सहभागी झाले होते. सांगलीत यापूर्वीही काही डायग्नोस्टिक सेंटर व रुग्णालयांकडून जैववैद्यकीय कचरा उघड्यावर किंवा कोंडाळ्यात टाकल्याबद्दल महापालिकेने कारवाई केली आहे. कारवाई होऊनही असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना बाधा पोहोचत आहे.